शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी परिवहन विभागाला दीड महिन्यात मिळाला 18 कोटींचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 16:19 IST

पिंपरी : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी  जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये आरोग्यविषयक सुचनांचे पालन करुन योग्य ती ...

ठळक मुद्देसाडेचार वाहनांची नोंदणी : दुचाकींची संख्या सर्वाधिक

पिंपरी : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी  जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये आरोग्यविषयक सुचनांचे पालन करुन योग्य ती काळजी घेऊन कामकाज सुरळीत पार पडताना दिसून आले. सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करत चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात देखील सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करत काम सुरु झाले आहे. गेल्या दीड महिन्यात (18 मे ते 30 जून 2020) या कालावधीत विभागाला 18 कोटी 26 लाख 80 हजार 186 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक  परिवहन अधिकारी विनोद सगर यांनी दिली. याशिवाय या दरम्यान तब्बल 4750 वाहनांची नोंदणी झाली आहे.    पुण्यापाठोपाठ नवीन वाहनांच्या नोंदी, पासचे नुतनीकरण, वाहनांवरील कर भरण्यात पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाचा क्रमांक लागतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर विभागाला महसूल प्राप्ती होते. मागील तीन महिन्यांपासून पिंपरी चिंचवड आरटीओ विभागाचे कामकाज कोरोनाच्या भीतीने अंशत: सुरु होते. यात केवळ कार्यालयीन कामाला प्राधान्य देण्यात आले होते. यावेळी नागरिकांना प्रत्यक्ष येऊन वाहन नोंदणी, पासचे नुतनीकरण या कामाकरिता प्रवेश नव्हता. आता प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेऊन कामकाज सुरु करण्यात आले आहे. दीड महिन्याच्या कालावधीत दुचाकींची नोंद सर्वाधिक झाली असून त्याची संख्या 2951 इतकी आहे. तर चारचाकी वाहनांची संख्या 1402 एवढी आहे. याबरोबरच,  कंसात वाहनांची संख्या  ट्रँक्टर (137), रुग्णवाहिका (2), बांधकामासाठी लागणारे साधनसामुग्री (12), क्रेन (8), रिक्षा (1), खोदणारे यंत्र (11), मोठी वाहने (57), मोटार कँब (13), तीन चाकी वाहने (12), तीन चाकी वाहने (प्रवाशांसाठी 139)यांची नोंदणी क रण्यात आली आहे.  याप्रमाणे एकूण साडेचार हजार अधिक वाहनांकडून 18 कोटी 26 लाख 80 हजार 186 रुपयांचा नोंदणी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. याविषयी अधिक माहिती देताना अधिकारी सगरे म्हणाले, कोरोनामुळे प्रशासकीय विभागापुढे अनेक अडचणी होत्या. मात्र आता त्यावर मात करुन नागरिकांना सुविधा देण्यासाठी विभाग कार्यरत आहे. नेहमीपेक्षा कार्यालयात येणा-या नागरिकांची संख्या कमी असून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे. वाहन नोंदणी विभागाजवळ सँनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित अंतर ठेऊन मास्क व ग्लोव्हज वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRto officeआरटीओ ऑफीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस