शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत कोरोनाचा विळखा वाढतोय; शहरातील बाधितांची संख्या ३७ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 20:58 IST

तबलिगीच्या सहवासात आलेल्यांची पॉझिटिव्ह रुग्णांत समावेश

ठळक मुद्देरविवारी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण

पिंपरी :  शहरात मागील सहा दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये भर पडत आहे. सोमवारी रात्री दोन पुरुष रुग्णांची भर पडली आहे. दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या दोन पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चौदा दिवसांत २४ रुग्ण आढळून आले आहेत. सहा दिवसांत सतरा नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामधील एक रुग्ण दिल्लीतील तबलिगीच्या कार्यक्रमातून आलेल्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ वर पोहोचली आहे.पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा विळखा वाढत आहेत. तबलिगीच्या सहवासात आलेल्यांची पॉझिटिव्ह रुग्णांत समावेश आहे. सोमवारी रात्री दोन जण आढळले आहेत. त्यात एकाचे २३ आणि दुसऱ्या रुग्णाचे ४८ वय आहे. दुसरा रुग्ण कोणाच्या संपर्कात आला होता, त्याची हिस्ट्री काय आहे, याची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या दोघांचे आता रिपोर्ट आले असून, दोघे पॉझिटिव्ह आले आहेत.-----------------विळखा घट्ट होतोय रविवारी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर दुपारी नर्सच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. अशा पाच जणांना रविवारी एकाच दिवशी कोरोनाची लागण झाली होती. तर ८ एप्रिलपासून शहरात दररोज कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत. मागील सहा दिवसांत तब्बल १७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. ८ एप्रिलला एक, ९ ला तीन, १०  एप्रिल रोजी चार, ११ एप्रिलला दोन, १२ एप्रिलला पाच आणि सोमवारी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित सक्रिय २४ रुग्ण शहरात आहेत. त्यातील २१ रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम  रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तीन सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस