शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत कोरोनामुक्तांची संख्या वाढली दुपटीने; ६५५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 22:00 IST

आजपर्यंत शहरातील एकूण ५७ हजार ११३ जण कोरोनामुक्त झाले..

ठळक मुद्दे५ हजार २१२ जणांना डिस्चार्ज; ३ हजार १८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह

पिंपरी : औद्योगिकनगरीत सोमवारी ६५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ११२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील ११ आणि पुण्यातील ३ अशा एकूण २० अशा एकुण ३१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ५ हजार २१२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. ३ हजार १८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.      पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात वैद्यकीय विभागाच्या वतीने संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्या आहेत. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम महापालिकेने सुरू केला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले असून निगेटिव्ह अहवाल येण्याची संख्या वाढत आहेत. त्यामुळे  डिस्चार्ज होणा रुग्णांची संख्या वाढली आहे.         दिवसभरात २ हजार ६८४ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी ३१८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ७० हजार ८२७ वर पोहचली आहे. तर १ हजार ७०१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ३ हजार ११० जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार २१२ झाली आहे.        ...........................१७०१ जणांचे अहवाल प्रतीक्षेतमहापालिका परिसरातील रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या कमी झाली आहे. १७०१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ११२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण ५७ हजार ११३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.            .....................   मृतांमध्ये तरुण आणि वृद्धांची संख्या अधिकपिंपरी-चिंचवड शहरातील ११ आणि पुण्यातील २० अशा एकूण ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ११५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तरूणांची, वृद्धांची संख्या अधिक आहे. त्यात पाच तरूण तर सहा ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू