शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात नवीन बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सोमवारी जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 20:54 IST

पिंपरीत आजपर्यंत एकूण ३६७५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्देदिवसभरात ५९३ नवे रुग्ण : १०३१ जण झाले कोरोनामुक्त  शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९,३३० झाली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असला तरी, सोमवारी दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपेक्षा दुपटीने रुग्ण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात ५९३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १०३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९,३३० झाली. सोमवारी दिवसभरात महापालिका हद्दीबाहेरील पाच नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ३,२१५ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ३,२३५ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. शहरात सोमवारी दिवसभरात १३ रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील एक जणाचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ८६६ तर महापालिका हद्दीबाहेरील १८६ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच २,५१५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ३,६६६ जणांना घरी सोडण्यात आले. तर ५,४५६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ९३० रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील १,९१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ३४,८४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह २५३ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.शहरात सोमवारी मृत झालेल्या रुग्णांमध्ये मोशी येथील ६५ वर्षीय पुरुष, चिंचवड येथील ६५ वर्षीय महिला, चिखली येथील ६३ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, थेरगाव येथील ७४ वर्षीय पुरुष, भोसरी येथील ६४ वर्षीय महिला, ४६ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय पुरुष, रहाटणी येथील ६३ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, रावेत येथील ३३ वर्षीय महिला, संभाजीनगर येथील ६४ वर्षीय पुरुष, खेड येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 

शहरातील रुग्णसंख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावरशहरात आजपर्यंत १,८३,३५७ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. तसेच आजपर्यंत १,७०,७८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १,३१,५१२ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहरात आजपर्यंत एकूण ३६७५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत ४९,३३० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर असून, त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटलMayorमहापौर