शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Corona virus News : पिंपरीत बुधवारी दिवभरात ८२७ जण कोरोनामुक्त; बारा जणांचा बळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 11:35 AM

दिवसभरात ७६४ नवीन कोरोना ग्रस्तांची नोंद..

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्ण होण्याची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी दिवसभरामध्ये महापालिका परिसरामध्ये ७६४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ८२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहर परिसरातील बारा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमातून शहर परिसरातील संशयित नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती, दिवसाला बाराशे ते दीड हजार रुग्ण आढळून येते होते. आता ही संख्या कमी होऊ लागला आहे. एक हजाराच्या आत रुग्ण आढळून येत आहेत. .................... १ हजार 0१ जणांचे अहवाल निगेटिव्ह महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आज दिवसभरामध्ये २ हजार ९९०जणांना दाखल करण्यात आले असून पुण्यातील एन आयव्हीकडे पाठविलेल्या घशातील द्रवाच्या नमुन्यांपैकी १ हजार 0१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार ९८८ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरामध्ये २ हजार ९४७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. 

............. रुग्णालयात दाखल असणाऱ्यांची संख्या ४ हजार ५६१ झाली आहे. दिवसभरामध्ये महापालिकेच्या रुग्णालयांमधून ८२७ जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६९ हजार ८८८ वर पोहोचली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८ हजार ८१ वर पोहोचली आहे. 

..........

बारा जणांचा बळी रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक तरी वेळेवर उपचार न घेतल्याने मृतांचे प्रमाण वाढू लागले आहे. शहर परिसरातील १२ आणि शहराबाहेरील ५ अशा १७ जणांचा बळी घेतला असून बळीमध्ये ज्येष्ठ व ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आजपर्यंत १ हजार ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकर