शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत हवालदाराला कोरोनाची लागण; चिंता वाढली : शहरात सात पोलीस झाले बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 19:26 IST

शहरातील एका पोलीस ठाण्यात मजुरांचे हे अर्ज स्वीकृतीची जबाबदारी संबंधित हवालदारावर होती.

पिंपरी : कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत भर पडतच आहे. उद्योगनगरीतील एका पोलीस हवालदाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या सात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाबाधित पहिला पोलीस गेल्या आठवड्यात १५ मे रोजी आढळून आला होता. त्यानंतर १८ तारखेला एका सहायक पोलीस निरीक्षकाचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यापाठोपाठ बुधवारी (दि. २०) एका पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे शहर पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने मजूर अडकले होते. त्यांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी या मजुरांकडून अर्ज मागविण्यात आले होते. हे अर्ज संबंधित पोलीस ठाण्यात संकलित केले जात होते. शहरातील एका पोलीस ठाण्यात मजुरांचे हे अर्ज स्वीकृतीची जबाबदारी संबंधित हवालदारावर होती. त्यामुळे या हवालदाराचा हजारो मजुरांशी थेट संपर्क आला. या हवालदाराच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहर पोलीस दलात कोरोना बाधित पोलिसांची संख्या शनिवारी सातवर पोहचली. मात्र सहायक पोलीस निरीक्षकाच्या दुसऱ्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तसेच त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.......................

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसshravan hardikarश्रावण हर्डिकर