शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Corona virus : मावळ तालुक्यातील ३०९२ लोकांना होमक्वारंटाईनचे आदेश; ओपीडी व रूग्णालये देखील बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 21:53 IST

मुंबई, पुणे, पिपरी चिंचवड व अन्य शहरातून मावळ तालुक्यात वास्तव्यास आलेल्या लोकांचा समावेश

ठळक मुद्देकोरोनाच्या भीतीने मावळ परिसरातील डॉक्टरांनी आपली खासगी ओपीडी व रुग्णालये बंद

मावळ : राज्यासह पुणे ,पिपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूचे लागण झालेले रुग्ण आढळून आले. त्यानंतर जिल्हा प्रशासन,आरोग्य विभाग , डॉक्टर,कर्मचारी सतर्क झाले. शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून विविध पावले उचलली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई,पुणे व इतर शहरातून मावळ तालुक्यात आलेल्या ३०९२ लोकांची नोंदणी करून त्यांच्या हातावर शिक्के मारले असून त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, यासोबतच कोरोनाच्या भीतीने मावळ परिसरातील डॉक्टरांनी आपली खासगी ओपीडी व रुग्णालये बंद ठेवले असल्याचे निदर्शनास आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार,परदेश दौरा करून आलेले ९६ व त्यांच्या सहवासातील १२२ असे एकूण २१८ जणांना यापूर्वीच आरोग्य खात्याच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. शासनाने जे नियम दिलेत त्याचे पालक करावे, असे आवाहन करतानाच त्यांनी मावळ तालुक्यात आत्तापर्यंत एकही रूग्ण आढळला नसल्याचे सांगितले. 

वडगाव मावळ परिसरात कोरोनाच्या खासगी दवाखाने व ओपीडी बंद       कोरोनाच्या भीतीने वैद्यकीय सेवा न देता मावळ तालुक्यातील रूग्णालय बंद ठेवून घरी बसणाऱ्या डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करून नोंदणी रद्द करावी असा आदेश विगागीय आयुक्त डॉक्टर दिपक म्हैसेकर यांनी दिला आहे.  अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहारे व  यांनी दिली.कोरोना विषाणू हा संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. असे असताना काही डॉक्टर्स,वैद्यकीय व्यावसायिक या करोनाच्या भीतीने वैद्यकीय सेवा देत नसल्याने तसेच ओपीडी व रूग्णालय बंद ठेवत असल्याचे निदर्शनास येत असल्याने उल्लंघन करणा-या डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायिकांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व महाराष्ट्र कोविड उपयोजना नियम २०२० या अनुषंगाने कारवाई करून त्यांची नोंदणी रद्द करावी असा आदेश विगागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.तसेच ओपीडी व रूग्णालय सुरळीत सुरू राहतील याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले आहे. 

मावळात होणार कारवाई..?

मावळात तालुक्यात  वडगाव, तळेगाव, कामशेत, लोणावळा, देहूरोड या चार प्रमुख शहरांसह  खेड्यापाड्यात खासगी डॉक्टरांची संख्या अधिक आहे. अनेकांनी आपली स्वताची रूग्णालय सुरू केली आहेत. तालुक्यात सुमारे २२५ ते २३० खासगी डॉक्टर आहेत. कोरोनाच्या भीतीने काही डॉक्टरांनी ओपीडी व रूग्णालये बंद ठेवली आहेत.

टॅग्स :mavalमावळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल