शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनारुग्णांनी ओलांडला पाच हजारांचा टप्पा; मंगळवारी दिवसभरात ३४२ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 12:36 IST

शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२०३ वर

ठळक मुद्देदिवसभरात ३४२ नवे रुग्ण : २३२ जण झाले कोरोनामुक्तमृतांची संख्येने शंभरी पार केली असून आजपर्यंत १०४ रुग्णांचा मृत्यू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून मंगळवारी दिवसभरात ३४२ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच महापालिका हद्दीबाहेरील १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२०३ वर गेली. तर दिवसभरात २३२ जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात १३६० संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. 

शहरात मंगळवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्येने शंभरी पार केली असून आजपर्यंत १०४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात महापालिका हद्दीतील ७२ तर महापालिका हद्दीबाहेरील ३२ जणांचा समावेश आहे. एनआयव्हीकडे पाठविलेल्या ११९४ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला. तसेच १९३७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून दिवसभरात १२७० जणांना घरी सोडण्यात आले. तर २४९२ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. मंगळवारी मृत झालेल्या रुग्णांमध्ये बौध्दनगर पिंपरी येथील ६४ वर्षीय पुरुष, शरदनगर चिखली येथील ८५ वर्षीय पुरुष, चिंचवड येथील ८४ वषीर्रु पुरुष, सुखवाणी पिंपरी येथील ६७ वर्षीय पुरुष, मिलिंदनगर पिंपरी येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ११६ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील २३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ३१३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह असलेले १३ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरDeathमृत्यू