शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Corona virus : कोरोना आम्हाला जगू अन् मरु पण देईना, हजारो कामगारांचे भवितव्य टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 11:35 IST

श्रीमंत शहरातील कामगार मात्र गरीब

ठळक मुद्देउद्योग, व्यवसाय बंद, कामाचा तुटवडा,कंपन्यांच्या धोरणांचा फटका

युगंधर ताजणे

पिंपरी: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड येथील हजारो कामगारांपुढे दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या भीतीने तब्बल एक ते दीड लाख कामगारांनी स्थलांतर केले आहे तर उर्वरित कामगारांना हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा संसर्ग यामुळे राज्य सरकारने सुरुवातीच्या काळात उद्योग धंद्यावर अनेक निर्बध घातले होते.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मात्र उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र या दरम्यानच्या काळात औद्योगिक शहरातील कामगारांपुढे 'मजुरीचे' संकट उभे राहिले आहे. हाताला काम नाही, रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तीन हजार एकर क्षेत्रात असलेल्या एमआयडीसीमध्ये 22 ब्लॉक मध्ये छोट्या मोठ्या स्वरूपाच्या चार ते पाच हजार कंपन्या आहेत. यात काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीच लाखापेक्षा अधिक आहे. यातील किमान एक लाख कामगार कोरोनामुळे आपल्या गावी परतले आहेत. महिला कामगारांची संख्या 50 ते 60 हजाराच्या घरात आहे. परंतु सध्या कंपन्या बंद असल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. रोजगाराची अनुउपलब्धता, उद्योग बंद आणि मोठमोठ्या कंपन्याच्या धोरणाचा फटका कामगारांना बसला आहे. मोठ्या कंपन्याकडून स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला 'ऑर्डर' मिळणे बंद झाल्याने अडचण वाढली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज वेगळा पर्याय शोधताना दिसत आहेत. पिंपरी चिंचवड याठिकाणी ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या या कंपन्यामध्ये पेंडिंग कामे सुरू असल्याने त्यांच्याकडून इतर कंपन्यांना स्पेअर पार्टच्या मिळणाऱ्या ऑर्डर कमी झाल्या आहेत. यामुळे कंपन्यामध्ये काम नाही. 

..................

एमआयडीसीमध्ये ज्या कंपन्यामध्ये यापूर्वी 100 ते 200 कामगार काम करत होते ते काम केवळ 30 ते 60 कामगारांमध्ये केले जात आहे. गावी न गेलेल्या कामगारांना काम मिळणे अवघड झाले आहे. 

काही ठिकाणी मोठ्या संख्येने कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. बालाजीनगर, फुलेनगर, लांडेवाडी, यशवंतनगर, या झोपडपट्टी भागात राहणारे लोक एमआयडीसीत कामाला आहेत. परंतु आता याभागातील कामगार बेकार झाले आहेत. 

…..............

50 टक्क्यांहून अधिक कामागार पुण्यावरून ये जा करणारे आहेत ते येणे बंद झाले आहे. काही ठिकाणी परिस्थिती पूर्ववत होत आहे. मात्र त्यासाठी बराचसा वेळ लागणार आहे. 

........

वाहनविक्री बंद, त्यावर आधारित उद्योग बंद, कामाचा तुटवडा, मोठया कंपन्यांच्या धोरणांचा कामगारांना फटका बसत आहे. 'यापुढील याकाळात आमच्याकडून किती प्रमाणात ऑर्डर मिळेल याबद्दल सांगू शकत नाही तेव्हा आपआपल्या जबाबदारीवर प्रॉडक्शन करा.' असे सांगण्यात आले आहे. नवीन उद्योजक यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. पिंपरीतील अनेक कंपन्या या गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली याठिकाणी गेल्या आहेत. ज्यापूर्वी पिंपरी एमआयडीसी मध्ये होत्या. त्याच्यावर आधारित कामगार बेकार झाला आहे. अनेक कंपन्याची जागा ही मॉल, आयटी सेंटर आणि बाहेरच्या मल्टिनॅशनल कंपन्यानी घेतली आहे. त्याठिकाणी सुरू असलेले उद्योग बंद पडले आहेत. कामगार वर्ग हवालदिल झाला आहे. - अभय भोर, अध्यक्ष फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, पिंपरी चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbusinessव्यवसायEmployeeकर्मचारीLabourकामगारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस