शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : मावळ तालुक्यात दुसरा कोरोना रुग्ण; ३७ वर्षीय नर्सला संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 19:44 IST

दोन्ही नर्स पुण्यात शिवाजीनगर येथील रुग्णालयात काम करून रात्री मुक्कामाला तळेगाव व माळवडी येथे येत असत.

ठळक मुद्देपुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखलतळेगावबरोबरच माळवाडी देखील यापूर्वीच कंटेनमेंट झोन म्हणून घोषित नर्सच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांचेही संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार

वडगाव मावळ : कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या आणखी एका नर्सला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मावळात दुसरा रूग्ण आढल्याने खळबळ उडाली आहे.तीन दिवसांपूर्वी तळेगावमध्ये एक संशयित कोरोनाबाधित नर्स सापडली होती. आता तळेगाव शेजारीच असलेल्या माळवडी येथे राहणारी एक ३७ वर्षीय नर्स कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने तळेगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नर्स पुण्यात शिवाजीनगर येथील एकाच रुग्णालयात कामाला आहेत. या दुसऱ्या नर्सला देखील पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तळेगावबरोबरच माळवाडी देखील यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या नर्सच्या कुटुंबातील पती व दोन मुलगे यांना देखील पुण्याच्या रुग्णालयात पाठविण्यात आले असून जवळचा संपर्क असल्याने त्यांचीही कोरोना निदान चाचणी करवून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या व्यतिरिक्त संबंधित नर्स आणखी कोणा-कोणाच्या संपर्कात आली होती, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.तळेगाव स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय नर्सच्या खासगी प्रयोगशाळेत केलेल्या कोरोना निदान चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी आदेश काढून तळेगाव दाभाडे, तळेगाव स्टेशन, वराळे, माळवाडी, कातवी, आंबी, वारंगवाडी, कोटेश्वरवाडी, सीआरपीएफ कॅम्प तसेच वडगावचा काही भाग पुढील आदेश मिळेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सोमाटणे, इंदोरी, परंदवडी आदी ठिकाणी ' बफर झोन ' जाहीर करण्यात आला आहे. दुसरी नर्स देखील प्रतिबंधित क्षेत्रात राहणारीच असल्याने पुन्हा नवीन आदेश काढण्यात आलेला नाही.

दोन्ही नर्स पुण्यात शिवाजीनगर येथील रुग्णालयात काम करून रात्री मुक्कामाला तळेगाव व माळवडी येथे येत असत. तळेगावच्या नर्सच्या शासकीय प्रयोगशाळेतील कोरोना निदान चाचणीचा अहवाल अद्यापि प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले. तिच्या संपर्कात आलेल्या एकूण 38 जणांचे तळेगावमध्येच संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी जवळच्या संपकार्तील सहाजणांची कोरोना निदान करवून घेण्यात येणार आहे.

माळवाडी येथील नर्सचे घर एका चाळीत असल्याने तसेच चाळीतील रहिवासी सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करीत असल्याने काळजी व्यक्त करण्यात येत आहे. माळवाडीच्या नर्सच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांचेही संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुनील शेळके, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गट विकास अधिकारी शरद माळी व तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी माळवडी येथे जाऊन संबंधित नर्स राहत असलेल्या परिसराची पाहणी केली. त्यावेळी माळवाडीचे सरपंच सुनील दाभाडे व पोलीस पाटील रवींद्र दाभाडे उपस्थित होते. 

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWomenमहिलाhospitalहॉस्पिटल