शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Corona virus : पिंपरीत आता मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई; २०० रुपये दंड आकारला जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 13:47 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता फिजिकल अंतर पाळण्याबरोबरच मास्क परिधान करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील नागरिकांना मास्क वापरण्याचे ८ एप्रिल रोजीच्या आदेशाद्वारे बंधनकारक कोरोनाचा संकट समोर असतानाच आता पावसाळ्यातील साथीच्या रोगांचा सामना करावा लागणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा वाढत आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मास्क वापरण्याचे ८ एप्रिल रोजीच्या आदेशाद्वारे बंधनकारक केले आहे. मात्र तरीदेखील नागरिकांकडून या नियमाचे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे यापुढे कोरोनाच्या कालखंडात सार्वजनिक ठिकाणी वापरणे अनिवार्य केले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ५०० रुपये दंड निश्चित केला होता. मात्र, स्थायी समितीने त्यात कपात करून दोनशे रुपये करावा, असा ठरावा मंजूर केला आहे.पिंपरी - चिंचवड शहरामध्ये अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता फिजिकल अंतर पाळण्याबरोबरच मास्क परिधान करणे आवश्यक आहे. शहरातील नागरिक मास्कचा वापर करत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली होती. शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालयांसह इतर सर्व परिसरात वावरताना मास्क परिधान न करणाठया नागरिकांविरोधात कारवाई करत ५०० रुपये दंड वसूल केला जात होता. परंतु, दंडाची रक्कम जास्त आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांना रोजगार नाही. घराबाहेर पडल्यावर मास्क खराब झाला. तर, ५०० रुपये दंड भरणे अशक्य आहे. त्यामुळे ५०० रुपयांऐवजी २०० रुपये दंडाची आकारणी करावी, अशी उपसूचना स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी सभेत मंजूर केली आहे.  

...........................

पावसाळ्यात दोन मास्क जवळ बाळगाकोरोनाचा संकट समोर असतानाच आता पावसाळ्यातील साथीच्या रोगांचा सामना करावा लागणार आहे. पावसाळा सुरू झाला असून डेंग्यू, मलेरिया आशा आजारांची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेकडून धुरीकरण, औषध वाटप, जनजागृती अशा उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त खबरदारी बाळगावी. दोन मास्क जवळ बाळगावेत. हात वारंवार सॅनिटाईज्ड् करा, असे आवाहन  आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.  

शहरात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने आता साथीचे आजारही तोंड वर काढणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.  हर्डीकर म्हणाले, नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. प्रत्येकाने कार्यालयात जाताना एक जादा मास्क स्वत:जवळ ठेवावा. पावसाळ्यात कार्यालयाला जात असताना मास्क ओला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरडा मास्क बाळगण्याची आवश्यकता आहे. हँड सॅनिटाईझेशन व्यवस्थित आणि वारंवार चालू ठेवावे. यामुळे अन्य आजारांपासूनपण बचाव करु शकता. सुरक्षित अंतराचे पालन करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर