पिंपरी : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून दिवसभरात ९८७ रूग्ण आढळले असून शहरातील १८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ५१८ जण कोरोनामुक्त झाले असून २ हजार ५२७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. दाखल रुग्णांपैकी डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून दिवसभरात १९६६ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करून असून एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी ५६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या २८ हजार ०६५ पोहोचली आहे. तर २ हजार ६३० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. २ हजार ५२७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ४ हजार ८५१ झाली आहे. कोरोनामुक्त प्रमाण वाढलेदाखल रुग्णांपैकी डिस्चार्ज होणाºया रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही अधिक असून दिवसभरात ५१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकुण १९ हजार ३१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.मृतांमध्ये पुरुषांची संख्या अधिक शहरातील १५ आणि इतर भागातील ३ अशा एकुण १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात वृद्धांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत ४७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात सहयोगनगरातील ५५ वर्षीय पुरुषाचा, आकुर्डी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा, भोसरी येथील ७२, ६२ वर्षी पुरुषाचा, डांगे चौक थेरगाव येथील ६३ वर्षी महिलेचा, वाल्हेकरवाडी येथील ६७ वर्षीय पुरूषाचा, काळेवाडी येथील ५५ वर्षीय पुरूषाचा, चिखली येथील ८१ वर्षीय पुरुषाचा, चिंचवड येथील ५६ व ६२ व ३५ वर्षीय पुरुषाचा, थेरगाव येथील ६३ वर्षीय महिलेचा, पिंपरी येथील ५० व ६३ वर्षीय पुरुषाचा, भोसरी येथील ३५ वर्षीय पुरुषाचा, चाकण येथील ५० व ६० वर्षीय पुरुषाचा देहूरोड येथील ४७ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
Corona virus : पिंपरीत शनिवारी ९८७ नवे कोरोनाबाधित; १८ जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 23:20 IST
शहरात शनिवारी दिवसभरात ५१८रुग्ण झाले ठणठणीत बरे
Corona virus : पिंपरीत शनिवारी ९८७ नवे कोरोनाबाधित; १८ जणांचा बळी
ठळक मुद्देदाखल होणाऱ्यांपैकी डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या अधिक