शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात चोवीस तासांत आढळले नवीन पाच कोरोनाबाधित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 20:56 IST

सोमवारी दिवसभरात एकही नवीन रूग्ण आढळलेला नाही.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा होऊ लागला घट्ट

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा आलेख वाढत असून गेल्या चोविस तासात एका पुरूषासह चार महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.  तर ६४ पैकी साठ रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी दिवसभरात एकही नवीन रूग्ण आढळलेला नाही. शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३५ वर गेली आहे. सोमवारी पाठविलेले  ५९ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. दिवसागणिक संशयित रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तेरा दिवसात २३ रूग्णांची वाढ झालेली आहे. पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह रूग्णात  दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिक आणि त्यांच्या सहवासात आलेल्यांचा समावेश अधिक आहे.सोमवारी ५९ जणांना रूग्णालयात दाखल केले आहेत. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत. सध्या रूग्णालयात ७८ रूग्ण दाखल असून आज ३८ जणांना घरी सोडून देण्यात आले आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातील ६४ जणांच्या घशातील द्रवाचे नमुने रविवारी पुण्यातील एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल रविवारी रात्री आले असून त्यात साठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर  चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात महिलांचा समावेश आहे. हाय रिस्क कॉन्ट्क्टमधून या महिलांना कोरोनाचा बाधा झाली आहे.  सोमवारी दिवसभरात एकही नवीन रूग्ण आढळलेला नाही. शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३५ वर गेली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ३५ असून त्यातील तीन रूग्ण पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून उर्वरित रूग्ण पिंपरीतील वायसीएम रूग्णालय आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात उपचार घेत आहे. मार्च अखेरपर्यत १२ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून २३ रूग्ण उपचार घेत आहेत. 

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर