शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

Corona virus : पिंपरी - चिंचवडमध्ये बुधवारी दिवसभरात ४९ नवीन कोरोनाबाधित, ३८ जण झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:46 IST

पॉझिटिव्ह रूग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण अधिक

ठळक मुद्देकोरोनामुळे मोशीतील ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू

पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून चोविस तासांत ४९ जणांना बुधवारी कोरोनाची बाधा झाली आहे. आजअखेर १३७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या ३८ जणांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोनामुळे मोशीतील ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. दिवसभरात शहरातील ४३ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये २८ पुरुष आणि १५ महिलांचा समोवश आहे.  शहरातील शिंदेनगर, जुनी सांगवी, यमुनानगर, पंचतारानगर आकुर्डी, विशाल एस्कऐवर पिंपरी, संत तुकारामनगर भोसरी, विठ्ठलनगर, नेहरूनगर, शास्त्रीनगर, रमाबाई नगर, वैभवनगर,  साईबाबानगर चिंचवड, वाल्हेकरवाडी, आनंदनगर पिंपळेगुरव, गुलाबनगर दापोडी, कुदळवाडी, कासारवाडी, शिवशाही नगर दिघी, तालेरानगर चिंचवड, पिंपरी, पिंपळेसौदागर, बौध्दनगर आणि वडगावशेरी, म्हाळुंगे, देहूरोड, येरवडा, आंबेगाव, कोथरूड या भागातील नागरिकांचा समावेश आहे. या रूग्णांवर महापालिकेच्या यशवंतरा चव्हाण स्मृती रूग्णालय आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

३८ जण कोरोनामुक्तपॉझिटिव्ह रूग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण अधिक आहे. आज आनंदनगर चिंचवड, अजंठानगर, भारतनगर, सद्गुरुकॉलनी वाकड, बौध्दनगर, अशोकनगर, सिध्दार्थनगर दापोडी, पिंपळेगुरव, पिंपरीगाव, गवळीनगर भोसरी, भाटनगर पिंपरी, वडमुखवाडी, संगमनगर जुनी सांगवी, बोपखेल, एमबी कॅम्प किवळे, खंडोबामाळ, दिघीरोड भोसरी, दत्त मंदिर वाकड, खराळवाडी, दापोडी येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या ३८ जणांना  घरी सोडले. आजपर्यंत १३७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ८२९ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ५१३  सक्रीय रूग्णांवर  उपचार सुरू आहेत............वृद्धेचा मृत्यूकोरोनामुळे शहरातील २४ जणांचा तर शहराबाहेरील,  महापालिका रूग्णालयात उपचार घेणाºया २० अशा ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. मोशीतील ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल