शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Corona virus : पिंपरीतील आनंदनगर, भीमनगर, सांगवीमध्ये आढळले कोरोनाचे १६ रुग्ण; बळीची संख्या २० वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 21:17 IST

पिंपरी महापालिका क्षेत्रात शुक्रवारी ४९ रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्या ४९७ वर पोहचली.

ठळक मुद्देआजपर्यंत २११ जण झाले कोरोनामुक्त

पिंपरी : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आनंदनगर, थेरगाव, बौद्धनगर, सांगवी, दापोडी, वाकड आणि पुण्यातील ४९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरातील रुग्णांची संख्या ४९७ वर पोहोचली आहे. तर सांगवी आणि  पुण्यातील दोन व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला असून, शहरातील बळीची संख्या वीसवर गेली आहे.पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णांची वाढ होत होती. ती आज कमी झाली आहे. शुक्रवारी ४९ रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्या ४९७ वर पोहचली आहे. २४७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  शहरातील २८ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील तर महापालिका हद्दीबाहेरील ४० रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आजपर्यंत २११ जण कोरोनामुक्त झाले असून, पुण्यातील बारा  आणि पिंपरी-चिंचवडमधील आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

२७५ जणांचे अहवाल प्रलंबितपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात १४० जणांना दाखल केले आहे. त्यामुळे एकूण दाखल रुग्णांची संख्या ५५० झाली आहे. तर आज ९८ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ९८ जणांना आज डिस्चार्ज दिला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील १८ पुरुष, २० महिला आणि पुण्यातील १०  पुरुषांचा आणि एक महिलेचा  समावेश आहे. त्यामध्ये

  किवळे, आनंदनगर, बौद्धनगर आणि पुण्यातील नागरिकांचा समावेश आहे. तर ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यात आनंदनगर, चिंचवड, वाल्हेकरवाडी , रुपीनगर,  बौद्ध नगर,  भीम नगर, चरहोली,  सांगवी,  नेहरूनगर,  दापोडी, वाकड, जुन्नर , कसबा पेठ, राजगुरू नगर, देहूरोड, औंध,  खडकी, सोलापूर,  आणि पुण्यातील आंबेगाव भागातील नागरिकांचा समावेश आहे. 

शहरातील आणि पुण्यातील १४ कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामध्ये चिखली, आनंद नगर, शिवाजीनगर, बीड येथील नागरिकांचा समावेश आहे.

............................सांगवी आणि पुण्यातील जुन्नर येथील दोघांचा मृत्यू सांगवी आणि पुण्यातील जुन्नर येथील व्यक्तीचा धोरणामुळे मृत्यू झाला आहे. सांगवी आणि पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह असणाºया  व्यक्तीस पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, कोरोनाने २० वा बळी घेतला आहे. बळींमध्ये पुण्यातील १२ तर पिंपरीतील आठ जणांचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू