शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
4
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
5
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
6
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
7
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
8
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
9
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
10
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
11
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
12
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
13
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
14
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
15
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
16
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
17
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
18
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
19
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
20
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला

कोेरोनाची भीती अन् रोजगार जाण्याची चिंता; पिंपरीतील कामगारांची दैनावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 17:10 IST

पिंपरी-चिंचवड एमआयडीसीत पाच लाखावर कामगार

ठळक मुद्देसोयीसुविधा नाकारून गावी जाण्यासाठी केले जातेय आर्जव घरमालकांकडून कामगारांकडे घरभाड्याच्या रकमेसाठी तगादा सामाजिक संस्था, संघटना व दानशूर व्यक्तींकडून कामगारांच्या कुटुंबांना किराणा व धान्य वाटप

नारायण बडगुजर-पिंपरी : लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने शहरात लाखांवर कामगार अडकून पडले आहेत. त्यांची दैनावस्था आहे. निवारा केंद्रांतील कामगारांची अवस्था न घरका, ना घाटका...अशी झाली आहे. रोजगार गेल्याने ते चिंतेत आहेत. मात्र त्याहीपेक्षा त्यांच्यात कोरोनाची दहशत आहे. निवारा केंद्रांत शेकडो कामगारांना एकत्र रहावे लागत आहे. तसेच छोट्याश्या भाड्याच्या खोल्यांमध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशक्य होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या भितीने त्यांना ग्रासले आहे. मदत किंवा सोयीसुविधा नको, आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, असे आर्जव त्यांच्याकडून करण्यात येत आहे.   पिंपरी-चिंचवडएमआयडीसीत पाच लाखावर कामगार आहेत. यात पुणे जिल्ह्यासह परजिल्हा व परराज्यातील लाखो कामगारांचा समावेश आहे. यातील ८५ टक्के कामगार हंगामी तसेच ठेकेदार तत्वावर काम करतात. या कामगारांचा थेट कंपनीशी संबंध नसतो. ठेकेदाराच्या माध्यमातून ते संबंधित कंपनीत काम करतात. त्यामुळे अनेक कंपन्यांनी या कामगारांची जबाबदारी घेण्याचे टाळले आहे. तर काही ठेकेदारांनी देखील त्यांच्या कामगारांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या जेवण व राहण्याचा खर्च करावा लागेल, असा विचार करून काही ठेकेदारांनी पळ काढला आहे. कामगारांनी त्यांना फोन केल्यानंतरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. हंगामी तत्वावरील कामगार एका कंपनीत १० ते ११ महिने काम करतात. त्यानंतर गावी निघून जातात. पुन्हा काही दिवसांनी शहरात येऊन नव्याने हंगामी पद्धतीने काम करतात. अशा कामगारांचा शहरातील रहिवास पुरावा नसतो. कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात. तसेच काही कुटुंबे सतत स्थलांतर करीत असतात. अशा कुटुंबांकडे देखील शहरातील रेशनकार्ड, आधारकार्ड किंवा इतर रहिवास पुरावा नसतो. अशा कुटुंबांना व कामगारांना सध्या शासनाकडून मदत मिळविण्यात अडचणी येत आहेत. शहरातील सामाजिक संस्था, संघटना व दानशूर व्यक्तींकडून कामगारांच्या कुटुंबांना किराणा व धान्य वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळत आहे. मात्र ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. काही कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी दीड ते दोन किलोमीटर चालत जावे लागते. यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याचे प्रकार समोर येत आहेत. 

घरमालकांकडून घरभाड्यासाठी तगादालाखो कामगार भाडे तत्वावर कुटुंबासह शहरात राहतात. तसेच हजारो कामगार कुटुंबाविना येथे वास्तव्य करतात. छोट्याश्या एकाच खोलीत १० ते १२ जण एकत्र राहत असल्याने त्यांचा कोंडमारा होत आहे. बाहेर पडता येत नसल्याने कोंबल्यासारखे त्यांना रहावे लागत आहे. असे असतानाही घरमालकांकडून कामगारांकडे घरभाड्याच्या रकमेसाठी तगादा लावण्यात येत आहे. उद्योग बंद असल्याने रोजगार गेला आहे. त्यामुळे घरभाडे द्यायचे कसे, असा प्रश्न या कामगारांना सतावत आहे.    

..........

अचानक लॉकडाऊन केल्याने कामगारांना गावी जाता आले नाही. दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळे कामगारांचे हाल होत आहेत. एक लाख कामगार बेरोजगार झाले आहेत. कंपनीच्या मालकांनी व शासनाने त्यांना जगण्यापुरते वेतन दिले पाहिजे. तसेच आणखी शेल्टर सुरू केले पाहिजेत. त्यासाठी आपत्कालीन सेवा सुविधा कायदा लागू करण्यात यावा.- अनिल रोहम, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य, ग्रीव्हज कॉटन एम्ल्पॉइज युनियन (आयटक)

....................

लॉकडाऊनमुळे कंपनी व्यवस्थापनाने ठेकेदारांना पैसे दिले नाहीत. त्यामुळे ठेकेदार कामगारांना पगार देत नाहीत. यातील हजारो कामगारांकडे शहरातील रेशनकार्ड नाहीत. त्यामुळे त्यांना मदत मिळण्यात अडचणी येत आहेत. तहसीलदार व तलाठी यांच्या माध्यमातून काही भागात मदत पुरविली जात आहे. मात्र ती मदत पुरेशी नाही. एकाच निवारा केंद्रात शेकडो कामगार आहेत. त्यामुळे तेथील सुविधांवर मयार्दा येत आहेत.- यशवंत भोसले, अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी

  ...............शहरात लाखो कष्टकरी व कामगार ठेकेदारी पद्धतीने काम करतात. मात्र त्यांच्या ठेकेदारांनी या कामगारांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. कामगारांची ही फसवणूक असून, अशा ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे. कामगार स्वाभीमानी असतात. त्यामुळे मदत घेताना देखील त्यांना संकोच वाटतो. मदत नको आम्हाला काम द्या, अशी त्यांची मागणी आहे. - काशिनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEmployeeकर्मचारीMIDCएमआयडीसीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस