शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील कोरोनाचा मृत्यूदर ३.४ टक्के;  दीड महिन्यात शहरात २०२८ संशयित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 21:03 IST

मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र कमी; आजपर्यंत चार जणांचा मृत्यू

ठळक मुद्दे८५ जण पॉझिटिव्ह, तर १८६६ जण निगेटिव्हपुण्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कडक उपाययोजना संशयितांच्या तपासण्या वाढविल्याएकूण रुग्णांपैकी १८६४ जणांना डिस्चार्ज आरोग्य, वैद्यकीय, पोलीस अशा सर्वच अत्यावश्यक सेवेतील सेवकांचे योगदान

विश्वास मोरे- पिंंपरी :  देशात सर्वत्र कोरोनाचा वेग वाढत असताना पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत हा वेग कमी आहे. गेल्या दीड महिन्यात शहरात २०२८ संशयित आढळले असून, त्यापैकी ८५ जण पॉझिटिव्ह, तर १८६६ जण निगेटिव्ह आढळले आहे. संशयित रुग्णांच्या तुलनेत सकारात्मक चाचणी येणाऱ्यांचे प्रमाण पाच टक्के आहे. तर निगेटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण ९०.१ टक्के तर मृतांचे प्रमाण ३.४ टक्के आहे. आजपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोना विषाणूंचा फैलाव महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात झपाट्याने होत असताना याचा वेग पुण्याचे जुळे शहर ओळखणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये कमी आहे. याचे कारण पुण्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर ११ मार्चपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेने कडक उपाययोजना केल्या.परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू केला. तसेच पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, महापालिकेचे भोसरीतील रुग्णालय, पिंपरीतील जिजामाता रुग्णालय सज्ज केले. तसेच परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन केले. तसेच संशयितांच्या तपासण्या वाढविल्या. २० मार्चपर्यंत शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ वर थांबली. त्यानंतर सलग दहा दिवस शहरात एकही रुग्ण सापडला नाही.चौदा दिवसांच्या उपचारानंतर १२ जण कोरोनामुक्तही झाले. शहर शंभर टक्के कोरोनामुक्त होत असतानाच ३१ मार्चच्या दरम्यान दिल्लीतील मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या ४४ जण सहभागी झाल्याची माहिती पुढे आली आणि कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होऊ लागला.

औद्योगिकनगरीतील चित्र  :  उपाययोजनांमुळे विषाणूंचा प्रसार झाला कमी१- पिंपरी-चिंचवड महापालिकेची लोकसंख्या २७ लाखांवर पोहोचली आहे. या प्रसाराला रोखण्यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी जोखीम स्वीकारून काम करीत आहेत. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आया, वॉर्डबॉय आदी कर्मचारी काम करतात. यातील जवळपास १९३ जण अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनासाठी सज्ज आहेत.२- दुबई, फिलिपिन्स, अमेरिकेतून प्रवास करून आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला. संशयितांच्या तपासण्या केल्या. तसेच होम क्वारंटाइनही केले.३-आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून तर आजपर्यंत एकही रजा न घेता, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, विविध संस्था, प्रशासकीय व्यवस्थेची संवाद ठेऊन प्रभावीपणे अंमलबजावणी केली.४- महापालिकेत २००९ मध्ये स्वाइन फ्ल्यूने थैमान घातले होते. त्यावेळी असणारी वैद्यकीय टीम हीच कोरोनासाठी निवडण्यात आली. या टीमला साथ आजार कसा रोखावा याचा अनुभव असल्याने हीच टीम कोरोनासाठी निवडण्यात आली. त्यामुळेही कोरानावर मात करण्यास मदतझाली आहे.५- पिंपरीतील वायसीएम रुग्णालय हे कोरोनावर उपचारासाठी उपलब्ध केले. तसेच संशयितांना क्वारंटाइन करणे, कंटेन्मेंट झोन असलेल्या भागात कडक उपाययोजना करणे, घरांचे सर्वेक्षण करून माहिती घेणे, फ्ल्यू क्लिनिक सुरू करणे, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत फ्ल्यू तपासणी केंद्रे उभारणे, शहरातील सार्वजनिक ठिकाणी संचारबंदी कडक करणे, डॉक्टर आपल्या दारी असे विविध उपाययोजना राबविण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात ११ मार्चला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर गेल्या ४५ दिवसांत ८५ रुग्ण आढळले आहेत. दाखल  संशयित २०२८ रुग्णांपैकी १८३६ जणांची चाचणी नकारात्मक आली आहे. हे प्रमाण ९०.१ टक्के आहे. एकूण रुग्णांपैकी पुण्याबाहेरील रुग्ण  २ असून पिंपरीतील; परंतु पुण्यातील रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण ९ आहेत. तर आजवर कोरोनामुळे चार जण दगावले असून, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी मृत्यू झालेल्यांचे प्रमाण ३.४ टक्के आहे. तर २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरानामुक्त होण्याचे प्रमाण ३२.९ टक्के आहे. एकूण रुग्णांपैकी १८६४ जणांना डिस्चार्ज केला आहे.

कोरोनाविरोधी लढ्यात सर्वांचेच योगदान मोलाचे आहे. यासाठी काम करणाऱ्या आरोग्य, वैद्यकीय, पोलीस अशा सर्वच अत्यावश्यक सेवेतील सेवकांचे योगदान आहे. पहिला रुग्ण सापडल्यापासून आपण कडक उपाययोजना केल्या त्याचा परिपाक म्हणजे रुग्णांचे प्रमाण कमी आहे. तसेच अनुभवी डॉक्टरांची टीम चांगले योगदान देत आहे. आपण कोरोनामुक्त झालेलो नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन शंभर टक्के केल्यास कोरोनावर मात करू शकतो. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूshravan hardikarश्रावण हर्डिकर