शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यावर " कोरोना" संकट; पिंपरी शहरात शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 19:20 IST

मिळकतकर, पाणीपट्टी बिले भरण्यास दोन महिने मुदतवाढ द्यावी

ठळक मुद्देचिंचवड, पिंपरी, भोसरी, निगडी, हिंजवडी, चिंचवड स्टेशन परिसरातील मॉलही बंद दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या रेल्वेस्थानके शुकशुकाटपुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात ९८ टक्के बंदला प्रतिसाद मिळाला आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांचा पिंपरी-चिंचवडबाजारपेठेत शुकशुकाट जाणवून आला. बाजारपेठ ठप्प झाली होती. सकाळी आणि सायंकाळी किराणा मालांची दुकाने, दुधविक्रेते, पेट्रोलपंप, भाजी मंडईत नागरिकांची काही प्रमाणात गर्दी झाली होती.चीननंतर कोरोनाचे संकट भारतावर आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत.  पिंपरी-चिंचवड परिसरात बारा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेडून उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच राज्य शासनाकडूनही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व सेवा वगळून इतर सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत.पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी असते. मात्र, आज या मार्गावर एखादं-दुसरे वाहन दिसत होते. तसेच शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गावर शुकशुकाट दिसून आला. चिंचवड, पिंपरी, भोसरी, निगडी, हिंजवडी, चिंचवड स्टेशन परिसरातील मॉलही बंद होते.  दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या रेल्वेस्थानके शुकशुकाट दिसून आला.   

भाजीसाठी लगबगअत्यावश्यक म्हणून भाजीपाला, दूध विक्री व किराणा विक्री सुरूच राहील, असे शासनाकडून सातत्याने जाहीर करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. भाजी खरेदीसाठी गर्दी  पिंपरीत लालबहादूर शास्त्री भाजी मंडई आहे.  चिंचवड, भोसरी, दापोडी, आकुर्डी या भागातील भाजी मंडईतही सकाळी सात वाजल्यापासून गर्दी झाली होती. 

कडेकोट बंदोबस्तविनाकारण रस्त्यावरून फिरणाºयांवर पोलिसांच्या वतीने कारवाई केली जात असून शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे या चौकांमध्ये वाहने तुरळक आहेत. मात्र पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत गर्दी झाल्याने येथील वाहनतळात मोठ्या संख्येने वाहने आली होती. सकाळी काही प्रमाणात गर्दी होती दुपारनंतर पोलिसांनी गर्दी होऊ न देणे यासाठी प्रयत्न केले. मंडईत दुपारनंतर शुकशुकाट होता. 

मिळकतकर, पाणीपट्टी बिले भरण्यास दोन महिने मुदतवाढ द्यावीपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाणीपट्टी, मिळकतकर, बांधकाम परवानगी आदी अनेक बिले भरण्याची मुदत मार्चपर्यंतची मुदत दोन महिन्यांनी वाढवावी, अशी मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मंगळवारी केली आहे. देशात कोरोना विषाणूचा हाहाकार पसरला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधीत रुग्णाची संख्या बारा वर पोहोचली आहे.

2 सध्या मार्च महिना चालू असून महापालिकेची पाणीपट्टी, मिळकतकर, बांधकाम परवानगी अशी अनेक बिले भरण्याची मुदत  मार्चपर्यंत आहे. त्यामुळे बिले भरण्यासाठी अनेक नागरिक पालिकेच्या कार्यालयात ये-जा करताना दिसत आहेत. नागरिकांची गर्दी म्हणजेच कोरोनाचा धोका अधिक, तसेच बिले भरण्याची कामे घरातील वयस्कर मंडळी करतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिले भरण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी. तसेच, नागरिकांना बिले भरण्यासाठी आॅनलाईनचा वापर करण्याचे आवाहन करावे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbusinessव्यवसायMarketबाजारPoliceपोलिसshravan hardikarश्रावण हर्डिकर