विकासासाठी भाजपाला साथ द्या

By Admin | Updated: February 16, 2017 03:08 IST2017-02-16T03:08:50+5:302017-02-16T03:08:50+5:30

भोसरीचा व पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, शहराला विकासाच्या वाटेवर गतिमान करण्यासाठी भाजपाला साथ द्या

Cooperate with BJP for development | विकासासाठी भाजपाला साथ द्या

विकासासाठी भाजपाला साथ द्या

भोसरी : भोसरीचा व पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, शहराला विकासाच्या वाटेवर गतिमान करण्यासाठी भाजपाला साथ द्या, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी भोसरी येथील कोपरा सभेत केले.
प्रभाग क्रमांक ७ म्हणजेच भोसरी गावठाण, गव्हाणेवस्ती परिसराचे भाजपाचे उमेदवार अ‍ॅड. नितीन लांडगे, सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे व संतोष लोंढे यांनी गेल्या काही दिवसांपासून भोसरी परिसर पिंजून काढत प्रचार केला आहे. दरम्यान, ठिकठिकाणी कोपरा सभा आयोजित करून नागरिकांना मतदानाबद्दल आवाहन करीत आहेत.
आमदार लांडगे म्हणाले, की प्रभागातील सर्व नागरिकांत सलोखा टिकवून विकासावर लक्ष केंद्रित केल्याने आज भोसरीच्या सुनियोजित विकासाला पुढे नेण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना नागरिकांनी साथ देणे गरजेचे आहे.
प्रलंबित प्रश्न व विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी मतदारांनी मतपेटीतून या उमेदवारांवर विश्वास दाखवल्यास परिसराचा सुयोग्य व परिपूर्ण विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अ‍ॅड. नितीन लांडगे म्हणाले, ‘भोसरीत नगरसेवक म्हणून काम करत असताना आ. महेश लांडगे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न व विविध प्रकल्प राबवण्यात आले. या वेळी सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे व संतोष लोंढे यांनीही उपस्थितांना मतदानाचे आवाहन केले.’ (वार्ताहर)

Web Title: Cooperate with BJP for development