Pimpri Chinchwad: रंग लावण्यावरून वाद; घरी येऊन तरुणावर कोयत्याने वार, पिंपरीतील घटना

By नारायण बडगुजर | Published: March 28, 2024 12:45 PM2024-03-28T12:45:57+5:302024-03-28T12:46:20+5:30

पिंपरीतील पत्राशेड येथील सेनेटरी चाळीत सोमवारी (दि.२५) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली...

Controversy over coloring; A young man was stabbed with a spear when he came home, an incident in Pimpri | Pimpri Chinchwad: रंग लावण्यावरून वाद; घरी येऊन तरुणावर कोयत्याने वार, पिंपरीतील घटना

Pimpri Chinchwad: रंग लावण्यावरून वाद; घरी येऊन तरुणावर कोयत्याने वार, पिंपरीतील घटना

पिंपरी : धुळवडीच्या दिवशी रंग लावण्यावरून चार जणांनी तरुणासोबत वाद घातला. त्यानंतर तरुणाच्या घरी येऊन त्याच्यावर कोयत्याने वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पिंपरीतील पत्राशेड येथील सेनेटरी चाळीत सोमवारी (दि.२५) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.

नॉडी गायकवाड (रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी), कार्तिक शेट्टी (रा. मिलिंदनगर, पिंपरी), ओम सावंत, अजित निकम (रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. प्रेम सचिन मोरे (१८, रा. सेनेटरी चाळ, पत्रा शेड, पिंपरी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि.२६) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळवडीच्या दिवशी दुपारी फिर्यादी प्रेम हे त्यांच्या घराच्या खाली थांबले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे चार जण रंग लावण्यासाठी तिथे आले. ‘माझ्या घरी पाहुणे आले आहेत. त्यामुळे आपण रंग नंतर खेळू’, असे प्रेम यांनी त्यांना सांगितले. तरीही त्यांनी प्रेम यांना रंग लावला. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर चौघेही तिथून निघून गेले. प्रेम यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम असल्याने ते लसून आणण्यासाठी भाजीमंडईत गेले होते. तिथे त्यांना पुन्हा चौघे दिसले. त्यामुळे ते पळून घरी आले. चौघे देखील प्रेम यांच्या पाठीमागे आले. प्रेम घराचा दरवाजा लावून बसले होते. चौघांनी प्रेम यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून शिवीगाळ केली. त्यांच्या घरात येऊन त्यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारून शिवीगाळ केली. त्यानंतर चौघे तेथून पळून गेले.

Web Title: Controversy over coloring; A young man was stabbed with a spear when he came home, an incident in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.