शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक ; कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदाराने जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 21:12 IST

कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने भरदिवसा पेट्रोल ओतून जाळल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. त्यात एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.

पिंपरी :  कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने भरदिवसा पेट्रोल ओतून जाळल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. त्यात एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथे  हा प्रकार घडला होता. याप्रकरणी दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.वाकडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष विश्वनाथ साह (वय ३३, रा. लेबर कॅम्प, ताथवडे. मूळ रा. चकईनायत, ता. जि. वैशाली, बिहार) असे जखमी कामगाराचे नाव आहे.  मोहम्मद अन्वर झुमरातिया (वय ४०, रा. तापकीरनगर, काळेवाडी), संतोषकुमार हरकराम (वय ३६, रा. वर्धमान कन्स्ट्रक्शन, ताथवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथील सर्व्हिस रोडच्या बाजूला एक बांधकाम साईट सुरू आहे.त्या साईटवर आरोपी मोहम्मद हा ठेकेदार, तर आरोपी संतोषकुमार फोरमन आहे.

साह हे ठेकेदाराकडे सेंट्रिंगचे काम करत होते. त्यांनी ठेकेदाराकडे कामाचे पैसे मागितले. वारंवार पैसे मागितल्याच्या रागातून आरोपीने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून ३ फेब्रवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास सुभाष यांना ठार मारण्याचा उद्देशाने त्यांच्यावर पेट्रोल ओतले. त्यानंतर माचीसच्या काडीने पेटवून दिले. त्यानंतर आरोपीच्या साथीदारांनी सुभाष यांना इंजेक्शन देऊन घडलेली हकीकत न सांगता खोटी हकीकत सांगण्यास भाग पाडले. जखमी सुभाष यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :wakadवाकडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस