शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ठेकेदार, समितीच्या संगनमताने शालेय साहित्य खरेदीत गैरव्यवहार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 19:05 IST

राज्य शासनाने बरखास्त केलेल्या शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ च्या शालेय साहित्य खरेदीच्या कराराला मुदतवाढ देण्याचा प्रताप सुरू आहे.

ठळक मुद्देआयुक्तांनी दिली नोटीस : निविदा प्रक्रिया न राबविता जुन्या कराराला बेकायदारित्या मुदतवाढ डल्ला सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर यांचे वाटप

- हणमंत पाटील-  पिंपरी : महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झालेले असतानाही २०१६-१७ च्या जुन्या शालेय साहित्य खरेदीच्या कराराला बेकायदा मुदतवाढ देण्यात आली. निविदाप्रक्रिया न राबविता शिक्षण समितीचे सदस्य व अधिकारी यांच्या संगनमताने सुमारे २२ कोटींच्या खरेदीला मान्यता देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. अनियमितता असलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी संबंधित सहा ठेकेदारांना निविदा रद्द करण्याविषयी नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांना दर वर्षी शालेय गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर, पीटी युनिफॉर्म, बूट-मोजे यांचे वाटप केले जाते. त्यासाठी डिसेंबर ते मार्चअखेरपर्यंत निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महापालिकेतील ठेकेदार व अधिकारी बदललेले नाहीत. त्यामुळे अधिकारी व ठेकेदारांचे संगनमत झाले असून, त्याला शिक्षण समितीचे पाठबळ मिळाले. त्यामुळे महापालिकेत सत्तांतर होण्यापूर्वी असलेल्या शिक्षण मंडळातील कारभाºयांनी केलेल्या करारानुसारच शालेय खरेदीचा कित्ता गिरवला जात आहे. राज्य शासनाने बरखास्त केलेल्या शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ च्या शालेय साहित्य खरेदीच्या कराराला मुदतवाढ देण्याचा प्रताप सुरू आहे. काही ठेकेदारांना नऊ वर्ष मुदतवाढ दिली आहे.......अनियमितपणे २२ कोटींची खरेदी४सुमारे ८.५ कोटींचे गणवेश, एक कोटीच्या व्यवसायमाला, १० कोटींचे पीटी गणवेश व स्वेटर, ७५ लाखांच्या वह्या, दोन कोटींचे पावसाळी रेनकोट व दप्तरे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी निविदा प्रक्रिया न राबविता जुन्या कराराला मुदतवाढ दिली आहे. सुमारे २२ कोटींचा शालेय साहित्य व गणवेश खरेदीचा प्रकार नियमबाह्य असून, ही प्रक्रिया रद्दची नोटीस पाठवून संबंधित ठेकेदारांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदारांशी संगनमत असलेल्या अधिकाºयांची महापालिकेचे पदाधिकारी व आमदार मंडळीकडे हस्तक्षेप करण्यासाठी व प्रकरण थांबविण्यासाठी धावाधाव सुरू आहे. कारभारी बदलले; ठेकेदार अन् अधिकारी तेच! महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत सत्तांतर घडून आले. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व भयमुक्त कारभाराचे आश्वासन देऊन भाजपाच्या हाती कारभार आला. मात्र, महापालिकेतील कारभारी बदलले, तरी कारभार मात्र बदलला नसल्याचे निविदाप्रक्रियातील घोटाळे व अनियमिततेवरून अनेकदा समोर आले आहे. भ्रष्ट कारभारामुळे राज्य शासनाने शिक्षण मंडळ बरखास्त केले. आता शिक्षण समिती अस्तित्वात आली, तरी समितीचे सभापती व सदस्यही अळीमिळी गुपचिळी पद्धतीने या प्रकरणात सहभागी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जुन्या कराराला नियमबाह्य पद्धतीने मुदतवाढ देताना अटी व शर्ती बदलण्यास समितीने मान्यता दिल्याचे दिसून येते. .........42 हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्यवाटप22 कोटी रुपयांच्या खरेदीला यावर्षी दिली मान्यता 17.25 कोटी गणवेश, व्यवसायमाला, पीटी गणवेशासाठीचा खर्च.....नोटीस दिलेले ठेकेदार     निधी मंजूर     साहित्य महालक्ष्मी ड्रेसेस अ‍ॅण्ड टेलरिंग फर्म     ८.५० कोटी    गणवेशकौशल्या प्रकाशन     १ कोटी     व्यवसायमाला     प्रेस्टीज गारमेंट्स    ८.२५ कोटी     पीटी गणवेश वैष्णवी महिला कॉर्पोरेशन     २.८० कोटी     स्वेटर सनराज प्रिंट पॅक     ०.७५ कोटी     वह्या सुपर प्लॅस्टिक कॉर्पोरेशन     १.५० कोटी     रेनकोट लकी प्लॅस्टिक     ०.८० कोटी     दप्तर ्न्न्न्न्न 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडStudentविद्यार्थीEducationशिक्षणfraudधोकेबाजी