शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कंटेन्मेंट झोन’; २७ एप्रिलपर्यंत कडक अंमलबजावणी राहणार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 13:08 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व सीमा व शहरातून बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद

पिंपरी : औद्योगिकनगरीत १० दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने शहराच्या सीमा सील केल्या आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहर कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. हा आदेश २७ एप्रिलपर्यंत कार्यरत राहणार आहे. त्यामुळे संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली असून, पोलिसांकडून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.पिंपरी-चिंचवड शहरात स्थानिक प्रसार सुरू होण्याची शक्यता असल्याने  नागरिकांच्या हालचालीवर, बाहेर फिरणाऱ्यांवर मर्यादा  आणण्यात आले आहेत.  पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील संपूर्ण भाग आजपासून कंटेन्मेंट झोन जाहीर झाला आहे.  त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व सीमा व शहरातून बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद केले आहेत............................................

दुपारनंतर शुकशुकाटशहरातील नागरिकांच्या बँकिंग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याच्या सूचनाकेल्या होत्या. त्यानुसार दुपारी दोननंतर बँका, पतसंस्था बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, शहरातील विविध बँकांची एटीएम केंद्रे सुरू होती.................................

कडेकोट बंदोबस्तपुणे-मुंबई महामार्गावरील भक्ती-शक्ती चौक, दापोडी चौक, बंगळुरू महामार्गावरील किवळे चौक, वाकड चौक, पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी चौक, आळंदी ते पुणे रस्त्यावरील देहूफाटा चौक, दिघी चौक, देहूगाव ते आळंदी रस्त्यावरील तळवडे , चाकण ते तळवडे रस्त्यावर चाकण एमआयडीच्या सीमेवर रस्ता बंद केला आहे. येणाऱ्या वाहनांची तपासणी करूनच वाहनांना सोडले जात आहे.  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे, पोलीस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचारी व वाहनांना सोडण्यात येत आहेत...........................................

मंडईवरही नियंत्रणसंचारबंदीचे पालन काटेकोरपणे केले जात आहे. कंटेन्मेंट झोन तयार केल्याने सकाळी १० ते दुपारी २ या कालवधीतच दूध, भाजीपाला, फळे यांची किरकोळ विक्री करावी. तसेच ही विक्री मनपामार्फत निश्चित केलेल्या जागांवरच असावी, असे निर्देश दिले होते. शहरातील चाळीस ठिकाणी दिवसभर भाजी मंडई सुरू करण्यात आली होती. मात्र, नवीन आदेशामुळे दुपारी दोनपर्यंतच मंडई सुरू होत्या. दुपारनंतर भाजी मंडई बंद करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसshravan hardikarश्रावण हर्डिकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस