शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

वाकडमधील कस्पटे वस्तीत सुरक्षा बेल्ट तुटून बांधकाम मजूर ठार; कंत्राटदारावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:00 PM

वाकड कस्पटे वस्ती येथील बांधकाम साईटवर काम करीत असताना सुरक्षा बेल्ट तुटल्याने खाली पडून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देडोक्यास गंभीर जखमी झाल्याने मजुराचा झाला मृत्यूवाकड परिसरात सलग दोन दिवसात दोन मजुरांचा सुरक्षिततेबद्दल निष्काळजीपणा दाखविल्याने मृत्यू झाला

पिंपरी : वाकड कस्पटे वस्ती येथील बांधकाम साईटवर काम करीत असताना सुरक्षा बेल्ट तुटल्याने खाली पडून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. निरापधा धिरेंद्र विश्वास (वय ४४) असे त्या मजुराचे नाव आहे. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील बांधकाम साईटवर काम करीत असलेल्या मजुराचा सुरक्षा बेल्ट तुटला. तो इमारतीवरून खाली कोसळला. डोक्यास गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. योग्य प्रकारे सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वाकड परिसरात सलग दोन दिवसात दोन मजुरांचा सुरक्षिततेबद्दल निष्काळजीपणा दाखविल्याने मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपुर्वी राजू विक्यानंद या मजुराचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या प्रकरणातही कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :wakadवाकडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड