सलग सुट्यांमध्ये अधिकारी ‘टूर’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2016 04:00 IST2016-04-10T04:00:23+5:302016-04-10T04:00:23+5:30
शासकीय कार्यालयांसह बँकांना शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्या आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह सहलीला जाण्यास प्राधान्य दिले. उन्हाळ्याचे दिवस

सलग सुट्यांमध्ये अधिकारी ‘टूर’वर
पिंपरी : शासकीय कार्यालयांसह बँकांना शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्या आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह सहलीला जाण्यास प्राधान्य दिले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास अधिक पसंती दिली जात आहे.
मागील महिना आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने या महिन्याच्या अखेरीला शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्यादेखील रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुटीच्या दिवशीही कामावर हजेरी लावावी लागली होती.
यातून थोडे ‘रिलॅक्स’ होण्यासाठी सलग सुट्यांचा मुहूर्त पकडत अनेकांनी बाहेर फिरायला जाण्यास पसंती दिली. गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवारी सुटी होती. तर महिन्यातील
दुसरा शनिवार आणि रविवार
अशा प्रकारे लागोपाठ तीन
सुट्या आल्या. यामुळे दूर
अंतरावरील सहलींना जाणे पसंत केले. (प्रतिनिधी)