शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:58 AM

जुन्या कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचे कारण देऊन पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी राज्य निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आज मुंबईत भेट घेऊन राजीनामा दिला.

पिंपरी - जुन्या कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचे कारण देऊन पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी राज्य निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आज मुंबईत भेट घेऊन राजीनामा दिला. मात्र, पक्षसंघटनेसाठी काम करणार असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना पिंपरी-चिंचवड काँग्रेसकडे लक्ष न दिल्याने काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी राजीनामा दिल्याने शहराध्यक्षपदी सचिन साठे यांची निवड झाली होती. सन २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भोईरांसह दहा नगरसेवकांनी राष्टÑवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. हा पराभव साठे यांच्या जिव्हारी लागला होता. पक्षबांधणीसाठी प्रयत्न करूनही पक्षाने ताकत न दिल्याने पराभवास सामोरे जावे लागल्याची खंतही साठे यांनी व्यक्त केली होती. तीन वर्षांच्या कालखंडात पिंपरी-चिंचवडकडे पक्षाने लक्ष न दिल्याने साठे यांनी राजीनामा दिला आहे.साठे म्हणाले, ‘‘गेली २४ वर्षे विद्यार्थिदशेपासून पक्षाच्या विविध पदांवर तन, मन व धन अर्पण करून काम केले आहे. यामध्ये पुणे जिल्हा एनएसयूआय अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व सध्या अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड जिल्हा काँग्रेस कमिटी अशा विविध पदांवर काम करण्याची संधी पक्षाने दिली. मी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. एक वर्षापूर्वी पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व सहकाऱ्यांमध्ये पुढील कार्यकाळाकरिता अध्यक्षपदावर पुनश्च निवड केली होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर सातत्याने अन्याय होत आला आहे. यापुढे पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे.’’विधान परिषदेवर पुन्हा अन्यायकॉँग्रेसची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड काँग्रेसकडे नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. वरिष्ठ नेत्यांनी लक्ष न दिल्याने पक्षाची ताकत कमी झाली. विधान परिषद निवडणुकीत आजपर्यंत पुण्याला सहा वेळा संधी मिळाली आहे. या वेळी पिंपरीतील काँग्रेसला संधी मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र, या वेळीही पुण्यातील शरद रणपिसे यांना संधी दिली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. विधान परिषदेवर डावलल्याचा निषेध अनेकांनी केला आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेस