शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

पाच हजार मालमत्तांवर होणार जप्तीची कारवाई ! २३४ कोटींची थकबाकी, अधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 13:16 IST

थकीत कराची वसुली करण्यासाठी करआकारणी व करसंकलन विभागाने थकबाकी असलेल्या ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आले आहे

पिंपरी : महापालिकेच्या हद्दीत ६ लाख ३३ हजार २९४ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. एकूण मालमत्ताधारकांपैकी अद्याप २ लाख २२ हजार ६५६ इतक्या मालमत्तांची थकबाकी आहे. थकीत कराची वसुली करण्यासाठी करआकारणी व करसंकलन विभागाने थकबाकी असलेल्या ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आले आहे.

थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यासाठी करसंकलन विभागाच्या विभागीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी यांना नेमले आहे. या जप्ती अधिपत्राच्या आधारे करसंकलन विभागाच्या विभागीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी यांना ‘नमुना ह’च्या जप्ती अधिपत्राद्वारे मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार करसंकलन विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

२३४.३१ कोटींची थकबाकी.....

करसंकलन विभागाकडून १५ विभागीय कार्यालयांमधील ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आलेल्या मालमत्तांकडे २३४.३१ कोटींची थकबाकी असून, २८.१९ कोटींची चालू मागणी अशी २६२.५० कोटींची एकूण मागणी आहे. याच अनुषंगाने मोशी विभागीय करसंकलन कार्यालयाकडून तात्काळ कार्यवाही सुरु करण्यात आली असून, स्थावर मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, मालमत्ता जप्ती सोबतच आता थकबाकीदारांच्या मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात यावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.

ज्या मालमत्ता जप्तीस पात्र आहेत, त्या तात्काळ जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषत: ज्या मालकांनी आपली निवासी मालमत्ता आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या अनुषंगाने भाडे तत्त्वावर दिलेल्या आहेत तसेच मिश्र व व्यावसायिक कारणांसाठी वापरात असलेल्या मालमत्तांसंदर्भात प्राधान्याने जप्ती करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. - अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, महापालिका

अशी आहे आकडेवारी

विभागीय कार्यालय - जप्ती अधिपत्र संख्या - थकबाकी - चालू - एकूणनिगडी प्राधिकरण - १९ - ३१.७५ - १.०३ - ३२.७८

आकुर्डी - ५४६ - १७.८९ - ४.०५ - २१.९४चिंचवड - १७७ - १९.९१ - १.७३ - २१.६४

थेरगाव - ३८७ - २९.८२ - २.९७ - ३२.७९सांगवी - ११३७ - ३०.२४ - ३.४६ - ३३.७०

महापालिका भवन - ४५३ - १३.८४ - २.१८ - १६.०२फ़ुगेवाडी दापोडी - ११० - २.३४ - ०.४४ - २.७८

भोसरी - ५० - ७.१९ - ०.७७ - ७.९६मोशी - २८३ - १०.०३ - १.१८ - ११.२१

चिखली - ४९९ - २९.९० - ३.८० - ३३.७०तळवडे - ४५२ - १८.८८ - २.७२ -२१.६०

किवळे - ४४० - ७.१३ - १.१६ - ८.२९वाकड - ५०६ - १५.३९ - २.७० - १८.०९

एकूण : ५०५९ - २३४.३१ -२८.१९ - २६२.५० 

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तMONEYपैसाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbusinessव्यवसाय