वीजसमस्यांनी दिघीतील ग्राहक त्रस्त, कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:51 IST2018-03-17T00:51:03+5:302018-03-17T00:51:03+5:30
परिसर व उपनगरात वीजपुरवठा खंडित होणे, ग्राहकांना अवास्तव रकमेची वीज बिले, भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली असतानाही वीजतारांचे खांब हटविण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी उघड्या तारांवर दिलेले अनेक वीजजोड, अशा अनेक समस्या आणि तक्रारींकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.

वीजसमस्यांनी दिघीतील ग्राहक त्रस्त, कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार
दिघी : परिसर व उपनगरात वीजपुरवठा खंडित होणे, ग्राहकांना अवास्तव रकमेची वीज बिले, भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली असतानाही वीजतारांचे खांब हटविण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी उघड्या तारांवर दिलेले अनेक वीजजोड, अशा अनेक समस्या आणि तक्रारींकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांना याबाबत सांगूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे दिघीकर संतप्त आहेत. या सर्व प्रकारांमुळे येथील सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या विविध परीक्षांचा काळ आहे. त्यामुळे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यासात व्यस्त असतात. असे असतानाही महावितरण कंपनीकडून सातत्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. व्यावसायिक आणि व्यापाºयांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराविरोधात दिघीकरांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला होता.
दिघीतील वीजसंबंधित समस्यांचे गाºहाणे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांसमोर मांडण्यात आले. समस्या सोडवण्याचे आश्वासन संबंधित अधिकाºयांकडून देण्यात आले होते; मात्र अद्यापही समस्या सोडविण्यात आलेल्या
नाहीत.
दिघीत स्वतंत्र वीज तक्रार निवारण केंद्र नाही. दिघीतील वीज समस्येबाबत तक्रार करण्यासाठी भोसरीतील केंद्रात जावे लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस दिघीतील तक्रारी वाढत आहेत. वाढत्या तक्रारी व अपुºया कर्मचाºयांची संख्या यामुळे तक्रार निवारणाला वेळ लागत आहे. दिघीत वीजतक्रार निवारण केंद्राची मागणी जुनी आहे. याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. परिणामी दिघीतील स्थानिकांना भोसरीकडे धाव घेऊन तक्रार दाखल करावी लागते. परिसरातील बहुतांश भागात भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली आहेत. वीजजोड देऊन पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, विद्युत खांबावरून उघड्या तारा काढून घेतल्यानंतर ते खांब हटविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे स्थानिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खांब हटविण्यासाठी तक्रार करून पाच महिने झाले, तरी अद्याप ता काढले नसल्याची तक्रार नागरिकांनी बोलून दाखविली.
दिघी परिसरातील ज्या भागांमध्ये भूमिगत केबलची कामे प्रलंबित आहेत, त्या ठिकाणीही महावितरणच्या विभागाची कामगिरी व्यवस्थित नाही. छत्रपती संभाजीमहाराज चौकातील व्यावसायिकांना लागणारी वीजजोडणी ही उघड्या विद्युत खांबावरून दिली आहे. प्रमाणापेक्षा जास्त जोड दिल्याने नेहमी शॉर्ट सर्किट होण्याचे प्रकार घडतात.
>अपघाताची शक्यता : लोंबकळणाºया तारा
महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका ज्ञानेश्वर पार्क मधील रहिवाशांना बसत आहे. कित्येक वेळा महावितरणच्या अधिकाºयांना समस्या सांगूनही कामे होत नसल्याच्या नागरिकांच्यातक्रारी आहेत. परिसरात ८६ घरे आहेत. त्या सर्व घरांना वीजजोड देताना सुरक्षेची काळजी किंवा नियमांचे पालन करण्यात आल्याचे दिसून येत नाही. ज्ञानेश्वर पार्क मधील एकाच विद्युत खांबावर हे सर्व जोड दिले असल्याने वायरींचे जाळे तयार झाले आहे. वीज मीटरपासून ते विद्युत खांबापर्यंत वायरची लांबी शंभर मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे वायर जळणे, हवेने तुटून पडणे, जोड निघून वीज बंद होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. २० फुटांच्या खांबावर वेलींचे प्रस्थ वाढले आहे. खांबाभोवती झाडाच्या फांद्या, वेली काढण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विद्युत खांबावरील वीज तारा जमिनीपासून कमी उंचीवर आहेत. त्यामुळे या लोंबकळणाºया वीजतारांना वाहनांचा स्पर्श होतो. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विजेच्या उघड्या तारा लोंबकळत असल्याने विजेचा प्रवाह वाहत असलेल्या तारा जोराच्या वाºयाने शॉर्ट सर्किट होऊन तुटून पडल्याच्या घटना सारख्या घडतात. दिघीकरांच्या या अनेक समस्यांवर मलमपट्टी न करता मुळापासून समस्या सोडविण्याची मागणी परिसरात जोर धरू पाहत आहे.