शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्या अन् शाळांकडे ४२३ कोटींची थकबाकी...! महापालिकेकडून मालमत्ता सील करण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:39 IST

टाटा मोटर्स कंपनीच्या मोकळ्या जमिनींचा १५० कोटींचा मालमत्ताकर थकीत आहे. मात्र

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई मोहीम तीव्र केली आहे. प्रतिसाद न देणाऱ्या मालमत्ता सील करून जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील ४३ मालमत्तांचा लिलावही सुरू करण्यात आला आहे. थकबाकी असलेल्या शाळा व मालमत्ता सील करण्यात येत आहेत. शहरातील शाळा व खासगी कंपन्यांकडून तब्बल ४२३ कोटींहून अधिक रुपयांची थकबाकी असल्याची करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.ज्या थकबाकीदारांनी नोटीस देऊन टाळाटाळ केली, अशा थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यात येत आहे. निगडी, आकुर्डी, सांगवी, फुगेवाडी दापोडी, भोसरी, चिंचवड, थेरगाव, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, चऱ्होली, चिखली, मोशी, तळवडे, किवळे, दिघी बोपखेल करसंकलन विभागीय कार्यालयातील वसुली पथकामार्फत थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस देण्याची कार्यवाही सुरू आहे. सर्वेक्षणात आढळले म्हणून...महापालिकेने केलेल्या मालमत्ता सर्वेक्षणात सापडलेल्या खासगी कंपन्या आणि शाळांकडून मागील तीन वर्षांचाच कर महापालिका वसूल करत आहे. मात्र, या मालमत्ता गेल्या दहा-बारा वर्षांपासून तिथे अस्तित्वात आहेत. मात्र, त्यांनी कर बुडविण्याच्या उद्देशानेच कर आकारणी विभागाकडे नोंदणीच केली नव्हती. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. त्यांच्याकडून मागील कर वसूल करण्यासही महापालिका असमर्थता दर्शवित असल्याचे चित्र आहे.दीडशे कोटींचा कर थकवूनही ‘टाटा’ला नोटीस नाही...निवासी व बिगरनिवासी थकबाकीदार असणाऱ्या मिळकतधारकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या मोकळ्या जमिनींचा १५० कोटींचा मालमत्ताकर थकीत आहे. मात्र, कंपनीला महापालिकेने कोणतीही नोटीस दिलेली नाही. २००० पासून महापालिकेने खुल्या जागांना नियमानुसार कर लावण्यास सुरुवात केली. त्यानुसार, टाटा मोटर्स कंपनीच्या महापालिका भवन, चिंचवड आणि चिखली करसंकलन विभागाच्या कार्यक्षेत्रातील मोकळ्या जागांना मालमत्ता कर आकारण्यात आला. त्यानंतर कंपनीने याबाबत विविध न्यायालयात दाद मागितली आहे. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांना यावर्षी विभागाकडून मिळकत कर बिले बजावण्यात असून, त्यांना अद्याप महापालिकेने कोणतीही नोटीस देण्यात आली नाही.सातबारा उताऱ्यावर थकबाकीचा ‘बोजा’ चढवणार!पाच लाखांहून अधिक थकीत रक्कम असणाऱ्या थकबाकीदारांनी येत्या दहा दिवसांमध्ये थकीत कर भरावा, अन्यथा आपल्या सातबारा उताऱ्यावर थकीत रकमेचा बोजा चढवला जाणार आहे. थकबाकीदारांनी कराचा त्वरित भरणा करून सातबारा उताऱ्यावर थकीत रकमेचा बोजा दाखल करण्याची कारवाई, मालमत्ता जप्तीची व मालमत्ता लिलावाची कारवाई टाळावी. कर जमा न करणाऱ्या थकबाकीदारांवर यापुढे महापालिका धडक मोहीम राबवून कर वसुली करणार आहे. - अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रTaxकरSchoolशाळा