दोन महिन्यांसाठी समितीचे सभापती

By Admin | Updated: October 15, 2016 03:03 IST2016-10-15T03:03:04+5:302016-10-15T03:03:04+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा या चार विषय समितींच्या सभापतींची निवड शुक्रवारी

Committee Chairman for two months | दोन महिन्यांसाठी समितीचे सभापती

दोन महिन्यांसाठी समितीचे सभापती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा या चार विषय समितींच्या सभापतींची निवड शुक्रवारी करण्यात आली.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई होते. या वेळी विधी समिती सभापतिपदी मंदा आल्हाट, महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी अनुराधा गोफणे, शहर सुधारणा समिती सभापतिपदी प्रतिभा भालेराव, तर क्रीडा समितीच्या सभापतिपदी समीर मासूळकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे देसाई यांनी जाहीर केले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित अपक्ष आघाडीचे गटनेते सुरेश म्हेत्रे, नगरसेवक गोरक्ष लोखंडे, अरुण बोऱ्हाडे, नगरसेविका आशा सुपे, शारदा बाबर, सहआयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, योगेश कडूसकर, मिनीनाथ दंडवते, डॉ. प्रवीण अष्टीकर, नगरसचिव उल्हास जगताप, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कायदा अधिकारी सर्जेराव लावंड आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Committee Chairman for two months