शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

केंद्राच्या योजनांच्या लाभासाठी समिती - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 03:10 IST

केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला व्हावा यासाठी पाच सादस्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे राज्याच्या हिस्स्या व्यतिरिक्त केंद्र्राच्या एकूण उपलब्ध निधीमध्ये राज्याचा हिस्सा वाढावा यासाठी विशिष्ट वेळेत प्रभावी प्रस्ताव वेळेत तयार करावा याची यंत्रणा उभी केली जाईल

पुणे : केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला व्हावा यासाठी पाच सादस्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे राज्याच्या हिस्स्या व्यतिरिक्त केंद्र्राच्या एकूण उपलब्ध निधीमध्ये राज्याचा हिस्सा वाढावा यासाठी विशिष्ट वेळेत प्रभावी प्रस्ताव वेळेत तयार करावा याची यंत्रणा उभी केली जाईल, असे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी पुण्यात सांगितले.राज्याच्या नियोजन विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रारूप आराखाडा बैठकी दरम्यान पत्रकारांशी बोलतानात्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली.तसेचराज्याच्या अर्थसंकल्पाची दिशाही रोजगार आरोग्य,शिक्षण, पाणी,शेती, पायाभूत सुविधा निर्माण करणारी असेल,असेही त्यांनी नमूद केले.मुनगंटीवार म्हणाले, ‘गरिबो के सन्मानमे भारत सरकार मैदान मे ’ या घोष वाक्यानुसार अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला. गरीबातील गरीब व्यक्तीक्तींपर्यंत आरोग्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.साधारणपणे ५० कोटी लोकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. १० कोटी कुटुंबाला वर्षाला पाच लक्ष रुपये आरोग्यावर खर्च होतील. तब्बल ७० लाख नवीन नोक-या तयार होतील,अशी व्यवस्था देशात तयार केली जाणार आहे.तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून नोक-या निर्माण करण्याचा आणि शेवटच्या कुटुंबापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न अर्थंकल्पात झाला आहे.बांबू मिशनसाठी मिळणार निधीमहाराष्ट्राला बचतगटातून मोठा हिस्सा मिळणार आहे. महाराष्ट्रात बांबू मिशन स्थापन करण्यात आले असून त्यासाठीही निधी मिळणार आहे. तीन लोकसभा विभागात एक मेडिकल कॉलेज सुरू केले जाणार त्यात राज्याला कॉलेज मिळतील. रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार असून मुंबईच्या लोकलसाठी मोठी रक्कम उपलब्ध करून दिली आहे. फुड प्रोसेसिंग युनिटमध्ये महाराष्ट्राला वाटा मिळेल, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.कृषी क्षेत्रासाठी ११ लाख कोटी पतपुरवठा करण्याचा निर्णय घेण्याबरोबरच ‘पीक क्लस्टर’ ही संकल्पना राज्याच्या कृषी व्यवस्थेला दिशा देणारी ठरणार आहे. ४२ हजार कोटी बचत गटांना असणारा निधी७५ हजार कोटी रुपयांपर्यंत घेवून जाण्यात आला आहे.त्यामुळे रोजगार मागणाºया हातापेक्षा रोजगार देणाºया हात निर्माण करण्याचा दृष्टीकोन अर्थसंकल्पातून दिसून येतो. अर्थसंकल्पात पर्यावरण विषयक लक्ष दिले आहे. १२९० कोटी बांबू मिशनसाठी ५०० कोटी ग्रीन भारतासाठी, निधीची तरतुद केली आहे.‘भारतमाता माझी आई पण डोके ठेवायला घर नाही’ अशी आजची आवस्था आहे.अनेक नागरिकांना स्वत:चे हक्काचे घर नाही. त्यामुळे प्रत्येकाला २०२२ पर्यंत बेघर असणाºयांना घर देण्याचा संकल्प जेटली यांनी केला आहे.आदिवासी बांधवांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी एकलविद्यालयाची कल्पना मांडण्यात आली आहे. प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळावा या उद्देशाने मुद्रा बँकेच्या माध्यमातून ३ लाख कोटी रुपये देण्याचा मोठा निर्णय झाला आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtraमहाराष्ट्र