आयुक्तांनी काढली महापौरांची समजूत

By Admin | Updated: February 10, 2016 03:25 IST2016-02-10T03:25:11+5:302016-02-10T03:25:11+5:30

महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेत दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या नावावरून नाराज झालेल्या महापौर शकुंतला धराडे यांची समजूत काढण्याची वेळ आयुक्त राजीव जाधव

Commissioner removed the mayor's understanding | आयुक्तांनी काढली महापौरांची समजूत

आयुक्तांनी काढली महापौरांची समजूत

पिंपरी : महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेत दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या नावावरून नाराज झालेल्या महापौर शकुंतला धराडे यांची समजूत काढण्याची वेळ आयुक्त राजीव जाधव यांच्यावर आली. आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर अखेरीस एकाच पुरस्कारासाठी राजश्री धनंजय पोटे आणि सुप्रिया सुनील सोळंकुरे यांच्या नावाची घोषणा महापौरांनी केली.
यंदाच्या पुरस्कारासाठी पाच जणांचे अर्ज आले होते. त्यात महापौरांनी पोटे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार महापौरांनी दिलेल्या एका नावाची शिफारस आणि समितीने दिलेले दुसरे नाव असे दोन पुरस्कार जाहीर करावेत, अशी सूचना प्रशासनाने महापौरांना केली. मात्र, पवनाथडी जत्रेच्या मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतच सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या नावावरून महापौर आणि सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर यांच्या शाब्दिक वादावादी झाली.
या पुरस्कारासाठी नाव सुचविले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्न महापौरांनी केला. त्या वेळी खांडकेकर यांनी पुरस्कारासाठी दोन नावे असल्याचे सांगितले. त्यावर ‘मी एकच नाव दिले होते. पुरस्कार एकाच व्यक्तीला द्या. दोन नावे कशासाठी? एक महिला सात वर्षे पुरस्कारासाठी अर्ज करीत आहे. तिच्यावर अन्याय कशासाठी, असा प्रश्न महापौरांनी केला. आपल्याही नावाचा विचार या पुरस्कारासाठी केला आहे, अशी भूमिका खांडकेकर यांनी मांडली. त्यानंतर आयुक्तांनी महापौरांची समजूत काढली.
पुरस्काराची दोन्हीही नावे राष्ट्रवादीच्या संदर्भातील आहेत. पोटे यांचे नाव महापौरांनी, तर सोळंकुरे यांचे समितीने सुचविले आहे. सोळंकुरे या राष्ट्रवादीच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Commissioner removed the mayor's understanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.