खुनाच्या निषेधार्थ कुदळवाडीत बंद
By Admin | Updated: January 9, 2017 03:08 IST2017-01-09T03:08:40+5:302017-01-09T03:08:40+5:30
चिखली, कुदळवाडी येथील श्रीराम शिवाजी वाळेकर यांच्या खुनाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली

खुनाच्या निषेधार्थ कुदळवाडीत बंद
पिंपरी : चिखली, कुदळवाडी येथील श्रीराम शिवाजी वाळेकर यांच्या खुनाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. रविवारी कुदळवाडीत बंद पाळण्यात आला. व्यवसायासाठी घेतलेल्या पैशांवर जास्त व्याज घेतल्यामुळे मेहबूब समीदउल्ला मणियार आणि समीदउल्ला अकबरअली मणियार या आरोपींनी वाळेकर यांचा खून केला.
मृतदेह कुदळवाडी येथील गोदामात पुरून ठेवला होता. या प्रकरणाचा शुक्रवारी उलगडा
झाला. असे प्रकार कुदळवाडी-चिखली परिसरात घडू लागले असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील, या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.