अल्पवयीनांमध्ये हाणामारी
By Admin | Updated: December 23, 2016 00:40 IST2016-12-23T00:40:32+5:302016-12-23T00:40:32+5:30
अल्पवयीन शाळकरी मुलांच्या गटांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. एकाने दुसऱ्यास कोयत्याने वार करून जखमी केले

अल्पवयीनांमध्ये हाणामारी
देहूरोड : अल्पवयीन शाळकरी मुलांच्या गटांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. एकाने दुसऱ्यास कोयत्याने वार करून जखमी केले, तर अन्य तिघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
सेंट ज्यूड हायस्कूल शाळा सुटल्यानंतर जाणाऱ्या मुलांना शिवीगाळ करून दमदाटी करीत असल्याबद्दल विचारणा करण्यास गेलेल्या एकावर शाळेसमोर मोकळ्या मैदानात थांबलेल्या एकाने कोयत्याने वार केले. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला असून, जखमींवर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देहूगाव येथील अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास हवालदार विजय चौधर करीत आहेत. (वार्ताहर)