शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

चिंचवड ते कन्याकुमारी सात दिवसांत; पर्यावरण, शिक्षण, आरोग्य विषयक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 04:41 IST

साडे सात दिवसांत चिंचवड ते कन्याकुमारी (तामिळनाडू) सायकल प्रवास जलदगतीने पूर्ण करण्याचा पराक्रम इंडो सायकलिस्ट क्लबच्या तीन तरुणांनी केला. चार राज्य, २२ जिल्हे, ११ मोठे घाट तसेच महामार्ग, डोंगर रांगा, किनारपट्टीचा प्रदेश व दोन घनदाट जंगले पार करून

पिंपरी : साडे सात दिवसांत चिंचवड ते कन्याकुमारी (तामिळनाडू) सायकल प्रवास जलदगतीने पूर्ण करण्याचा पराक्रम इंडो सायकलिस्ट क्लबच्या तीन तरुणांनी केला. चार राज्य, २२ जिल्हे, ११ मोठे घाट तसेच महामार्ग, डोंगर रांगा, किनारपट्टीचा प्रदेश व दोन घनदाट जंगले पार करून क्लबचे संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे, सदस्य शंकर गाढवे व उद्योजक हाज्जी देवनीकर यांनी ही मोहीम पूर्ण केली. त्यांच्याकडून १६३८ किलोमीटरचा प्रवास व १२,२३६ मीटरचे एलेवेशन कव्हर झाले.८ डिसेंबर रोजी सकाळी चार वाजता मोरया गोसावी गणपती मंदिर चिंचवड या ठिकाणाहून प्रवास सुरू केला. क्लब कोअर कमिटीचे अजित पाटील, विश्वकांत उपाध्याय, गणेश भुजबळ, अमित खरोटे तसेच ज्ञानप्रबोधिनीचे २० ते २५ विद्यार्थी, पालक व शिक्षक, अवधूत गुरव, अनुराग हिंगे आदी उपस्थित होते. गणपती बाप्पाला नारळ चढवून सातारा-कोल्हापूरच्या दिशेने सुरू झाला. ५ ते ७ किलो वजन सोबत घेऊन पूर्ण प्रकारे सेल्फ सर्पोटेड प्रकारातील ही मोहीम होती.पहिल्या दिवशी चिंचवड ते नेर्ले (कोल्हापूर) असा २०६ किमीचा तर दुसºया दिवशी नेर्ले (कोल्हापूर) ते धारवाड हा २२९ किमीचा टप्पा पार केला. नंतर धारवाड ते चित्रदुर्ग (२३३ किमी), चित्रदुर्ग ते म्हैसूर (२१८ किमी), म्हैसूर ते कालिकत (२३६ किमी), कालिकत ते कोची (२०० किमी) कोची ते तिरुअनंतपुरम (२१४ किमी), तिरुअनंतपुरम ते कन्याकुमारी (१०० किमी) हे टप्पे पार केले.चिंचवड ते नेर्ले (कोल्हापूर) दरम्यान कात्रज व खंबाटकी हे तर नेर्ले ते धारवाडदरम्यान तवांडी व बेळगावच्या आधी वंतामुरे घाट होते. तेथे उलट दिशेने येणाºया वाहनांचा त्रास झाला. धारवाड ते चित्रदुर्गदरम्यान बागेवाडी घाट लागला तर विरुद्ध दिशेने येणाºया वाºयामुळे अंतर कापणे सोपे गेले नाही. चित्रदुर्ग ते म्हैसूर हा मार्ग मुद्दाम निवडला होता. आम्ही सरळ बंगळुरू व मदुराईमार्गे ६ दिवसांत कन्याकुमारीला पोहोचलो असतो. पण तीन राज्यांत पसरलेले बंडीपूर व वायनाडचे घनदाट जंगल खुणावत होते. किनारपट्टीचा प्रदेशही आकर्षित करत होता. ओखी वादळ पण दूर गेल्याने किनारपट्टी भागातून सायकल चालवण्याचा आनंद घेता आला. बंडीपूरचे जंगल चंदन व हस्तिदंत तस्करीसाठी प्रसिद्ध आहे. वायनाडचे जंगल हत्ती व इतर हिंस्र पशूंसाठी प्रसिद्ध आहे. या दोन जंगलांमधील ८० किमीचा प्रवास अतिशय रोमांचकारी होता. वाटेत हरीण, हत्ती, माकड तसेच इतर प्राणी दिसले. या दोन जंगलांमध्ये पूर्वी म्हैसूरचा राजा शिकार करत असे. चंदनतस्कर वीरप्पनची याच परिसरात दहशत होती, असे कर्नाटक वन विभागाच्या अधिकाºयाने सांगितले. त्यांनी एक कर्मचारी वाहनही मदतीसाठी आमच्या मागे दिले. दख्खनच्या पठारावरून आम्ही पाचव्या दिवशी किनारपट्टी भागात म्हणजेच कालिकतमध्ये प्रवेश केला.कालिकत येथील क्लबच्या सदस्यांनी स्वागत करून पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. कालिकत पेडलर्सचे सदस्य आमच्या सोबत २० किमीपर्यंत आले. कालिकत ते कोचीदरम्यानचा मार्ग सरळ होता. पण हवामानातील आद्रता जाणवत होती. कोची ते तिरुअनंतपुरम हा प्रदेश निसर्गाने मुक्त उधळण केल्याप्रमाणे सुंदर आहे. तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभ स्वामी मंदिरात दर्शन घेऊन तामिळनाडूमध्ये प्रवेश केला. दरम्यान मुरुगन उत्सव चालू असल्याने भाविकांची मिरवणूक चालू होती.पुढे पाऊस सुरू झाला आणिआम्ही नागरकॉईल मार्गे दुपारी१२ वाजता कन्याकुमारीमध्येप्रवेश केला.रोज २२० किलोमीटरचा पल्लामहाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या चार राज्यांमधून सायकल प्रवास केला. पर्यावरण, सायकल वापर व आरोग्य, बदलती शिक्षण पद्धती किंवा शिक्षणाचे झालेले बाजारीकरण थांबविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळीच दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई व्हावी. शिक्षण हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. दररोज ८० ते १०० किलोमीटर सायकलिंगच्या सवयीमुळे प्रवास अवघड गेला नाही. रोज साधारण २२० किलोमीटर सायकल प्रवास केला गेला. साधारणत: पहाटे ५ ते दुपारी १२ पर्यंत सायकलिंग १२ ते ४ पर्यंत विश्रांती आणि ४ ते ८ पर्यंत सायकलिंग व पुन्हा ८ ते पहाटे ४ पर्यंत झोप अशा पद्धतीचा दिनक्रम होता.महाराष्ट्र, कर्नाटक , केरळ व तामिळनाडू या सर्व राज्यांतील लोकांचे प्रेम मिळाले. आपुलकीने सर्व चौकशी करत होते. त्यांना आमच्या मोहिमेबद्दल खूप उत्सुकता वाटत होती. अनेकदा लोकांनी घरी येण्याचा आग्रह केला. पण, प्रवासाच्या नियोजनामुळे जाता आले नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड