शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Chinchwad By Election: "मी देत आहे राष्ट्रवादीला शाप..." चिंचवड पोटनिवडणुकीत रामदास आठवलेंची कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 21:18 IST

भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते...

पिंपरी  : मी देत आहे राष्ट्रवादीला शाप कारण निवडून येणार आहे अश्विनी जगताप, नरेंद्र मोदी आहे सगळ्यांचे बाप, मग का नाही येणार अश्विनी जगताप, देवेंद्र आणि मी घेऊन आलोय जय भीमची काठी, कारण आम्ही दोघेही आहोत अश्विनीताईंच्या पाठी, अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. आठवले म्हणाले, ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही इच्छा होती. अजित पवार म्हणाले होऊन जाऊ द्या, असे जर आहे तर आता होऊनच जाऊ द्या. प्रधानमंत्री बनण्यासाठी एका बाजूला अनेक जन इच्छुक आहेत. मी म्हणालो होतो 'जितनी बढानी है दाढी पर राहुल गांधी की नही उनके जैशी बॉडी'. नरेंद्र मोदी हे 2024 ला प्रधानमंत्री होणारच आणि ते झाले की मी मंत्री होणारच असे म्हणताच मैदानात हशा पिकला.

ते संविधान बदलतील कसे? 

बाबासाहेब यांचे नाव घेणारे मोदी त्यांचे संविधान बदलतील कसे? संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जे लोक आरोप करतात त्यात तथ्य नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchinchwad-acचिंचवड