आंतरशालेय नृत्यस्पर्धेत बालचमूंची धमाल

By Admin | Updated: February 5, 2016 01:45 IST2016-02-05T01:45:59+5:302016-02-05T01:45:59+5:30

पिंगा ग पोरी पिंगा..., गणपती बाप्पा मोरया..., छान किती दिसते फुलपाखरु .., रिंगा रिंगा..., आयो रे आयो रे रंगीलो... अशा गाण्यांवर सादर केलेल्या कलाविष्काराने चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

Children's play in inter school dance competition | आंतरशालेय नृत्यस्पर्धेत बालचमूंची धमाल

आंतरशालेय नृत्यस्पर्धेत बालचमूंची धमाल

पिंपरी : पिंगा ग पोरी पिंगा..., गणपती बाप्पा मोरया..., छान किती दिसते फुलपाखरु .., रिंगा रिंगा..., आयो रे आयो रे रंगीलो... अशा गाण्यांवर सादर केलेल्या कलाविष्काराने चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
‘लोकमत’ बाल विकास मंच व एएसएम ग्रुप इम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल आयोजित आंतरशालेय नृत्यस्पर्धा उत्साहात पार पडल्या. अ व ब या दोन गटांत झालेल्या स्पर्धेत बालचमूंनी प्रेक्षागृहात एकच जल्लोष केला. स्पर्धेत २० शाळा सहभागी झाल्या होत्या. शाळांचा उत्साह, मुलांची ड्रेपरी व तयारी वाखाणण्यासारखी होती. प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.
प्राथमिक गटात ७ शाळा सहभागी झाल्या होत्या तर माध्यमिक गटात एकूण १३ शाळा सहभागी होत्या. अ गटामध्ये बांठिया प्राथमिक जैन विद्या मंदिर, एचए मराठी माध्यम आणि पीसीएमसी भोसरी इंग्रजी विद्यालयाने लोकनृत्य प्रकारात सहभाग घेतला. तर एच. ए स्कूल इंग्लिश मीडिअम, जयवंत प्राथमिक शाळा, एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल आणि स्वामी समर्थ विद्या मंदिर यांनी बॉलिवूड-हिपहॉप या नृत्यप्रकारात सहभाग घेतला. सुरुवातीला बांठिया स्कूलने ‘आयो रे, आयो रे, रंगीलो’ हे राजस्थानी लोकनृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. जयवंत प्राथमिक विद्यालयाने ‘छान किती दिसते फुलपाखरू’ या गाण्यावेळी फुलपाखरूच रंगमंचावर अवतरल्याने सर्वजण अवाक् होऊन पाहू लागले. तर ब गटामध्ये गीतामाता स्कूल, शिवभूमी विद्यालय, फत्तेचंद जैन विद्यालय, सुबोध माध्यमिक विद्यालय, सरस्वती माध्यमिक विद्यालय, ताराबाई मुथा कन्या प्रशाला, छत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय या शाळांनी लोकनृत्य प्रकारात सहभाग घेतला. एसएनबीपी इंटरनॅशनल, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, एच. ए हायस्कूल इंग्रजी विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, महात्मा फुले विद्यालय, इंदिरा गांधी विद्यालय यांनी बॉलिवूड-हिपहॉप सादर केले.
शिवभूमी विद्यालयाने कोळी नृत्याद्वारे कोळी समाजाचे दर्शन घडविले. शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाने डोंबारी नृत्य तर ताराबाई मुथा कन्या शाळेने आसामी नृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर आधारित सामाजिक संदेश देणारे नृत्य सादर केले. सचिन दाभाडे, रेखा खडका, कुणाल मोरे यांनी परीक्षण केले. इम्प्रोस इंटरनॅशनल स्कूलच्या उमित कौर यांनी शाळेबद्दल माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Children's play in inter school dance competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.