शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

पिंपरी- चिंचवड शहरातील लेबर कॅम्पमधील नागरिक, मुलांची सुरक्षितता महत्वाची : महापौर राहुल जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 13:52 IST

पिंपळे सौदागर येथील एका बांधकाम साईटवर असलेल्या लेबर कॅम्पमधून अडीच वर्षाच्या मुलीचा अत्याचार करून खून करण्यात आला.

ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश 

पिंपरी : पिंपळे सौदागर येथे मुलीवर झालेल्या अत्याचार घटनेचे पडसाद आजच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. शहर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पोलीस आयुक्तांना भेटून सुरक्षेच्या उपाययोजनाची मागणी करावी, अशी मागणी सर्वपक्षीयांनी केली. त्यावर चिंचवड शहरातील लेबर कॅम्पमधील नागरिकांची, त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी  प्रकल्पांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे. त्यांना तसे बंधनकारक करण्यात यावे, असा आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिला. महापालिकेची सर्वसाधारण झाली. पिंपळे सौदागर येथील एका बांधकाम साईटवर असलेल्या लेबर कॅम्पमधून अडीच वर्षाच्या मुलीचा खून करण्यात आला. या घटनेचे पडसाद आज सर्वसाधारण सभेत उमटले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका  मंगला कदम म्हणाल्या, शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुली, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना अतिशय दुदेर्वी आहे. नराधमांवर कडक कारवाई करण्यात यावी. शहरात  सीसीटीव्ही' कॅमेरे बसवावेत.ह्णह्णभाजपच्या नगरसेविका झामाबाई बारणे म्हणाल्या, बलात्कार, विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात.ह्णह्णशीतल काटे म्हणाल्या, स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित होत असलेल्या पिंपळेगुरवमध्ये मुली, महिला सुरक्षित नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात सर्वत्र 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसवावेत.ह्णह्णसत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ह्यह्यदोन वर्षाच्या चिमुरडीवर झालेली बलात्काराची घटना अत्यंत दुदेर्वी आहे. विकृती संपविणे गरजेचे आहे. कायदा सुव्यस्था अबाधित राहिली पाहिजे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविण्यात येत आहेत. उर्वरित ठिकाणी देखील कॅमेरे बसविण्यात यावेत.ह्णह्ण महापौर राहुल जाधव म्हणाले, ह्यह्यकायदा-सुव्यवस्था चांगली रहावी, याबात पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केली जाणार आहे. सीसीटीव्ही बसविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे. त्यानुसार शहरात सर्वत्र कॅमेरे बसविले जातील. बांधकाम प्रकल्पांवर नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्पांच्या कामाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात यावेत.ह्णह्ण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpimpale saudagarपिंपळे सौदागरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही