पिंपरीत बालिकेवर चुलत्याकडून अत्याचार

By Admin | Updated: March 25, 2017 03:53 IST2017-03-25T03:53:32+5:302017-03-25T03:53:32+5:30

सख्ख्या चुलत्यानेच सात वर्षांच्या पुतणीवर अत्याचार केल्याचा प्रकार शुक्रवारी पिंपरी परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी चुलत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Child abuse by the daughter | पिंपरीत बालिकेवर चुलत्याकडून अत्याचार

पिंपरीत बालिकेवर चुलत्याकडून अत्याचार

पिंपरी : सख्ख्या चुलत्यानेच सात वर्षांच्या पुतणीवर अत्याचार केल्याचा प्रकार शुक्रवारी पिंपरी परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी चुलत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
चुलत्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पास्को) गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चुलता आणि मुलीचे आई-वडील एकत्र राहतात. रविवारी मुलीची आई कामावर गेली होती. त्या वेळी मुलगी एकटी घरी असताना चुलत्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने आईला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने शुक्रवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चुलत्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान शहर परिसरामध्ये अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातून चिंता व्यक्त होत आहे. त्यातच अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार
वाढले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने
चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशा आरोपींना जलदगती न्यायालयात हजर करून शिक्षा करावी अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Child abuse by the daughter