शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले अन् न बोलताच निघून गेले! श्रीरंग बारणेंचे शक्तिप्रदर्शन

By विश्वास मोरे | Published: April 22, 2024 12:36 PM

आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढण्यात आली...

पिंपरी : महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. उमेदवारी अर्ज भरून माध्यमांशी न बोलताच निघून गेले. प्राधिकरणाच्या बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाडीतून कार्यकर्त्यांना अभिवादन केले

आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढण्यात आली. या शक्तिप्रदर्शन रॅलीची सुरुवात आकुर्डी येथील ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनाने रॅली सुरू झाली. ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात रॅली सुरू झाली. यावेळी महायुतीच्या घटकपक्षातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थिती दाखवली.  दुपारी बाराच्या सुमारास बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पीएमआरडीएच्या कार्यालयात दाखल झाले.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रवीण दरेकर, आमदार सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेंद्र थोरवे, माजी मंत्री बाळा भेगडे आदी सहभागी झाले आहेत. सव्वा बाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा प्राधिकरणाच्या बाहेर आला. त्यावेळी काही क्षण थांबून मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले. मात्र माध्यमांशी न बोलताच निघून गेले.१०० मीटरच्या आत कार्यकर्त्यांची गर्दी

प्राधिकरणातील मावळ लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात १०० मीटरच्या आत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते. जय श्रीराम च्या घोषणा देण्यात येत होत्या.

सुरक्षेचे नियोजन बिघडले

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये १०० मीटरच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मात्र सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले त्यांना अडवण्यात पोलिसांना अपयश आले. त्यामुळे शंभर मीटरच्या आत हजारो कार्यकर्ते एकत्रित झाले होते व घोषणा देत होते. 

टॅग्स :maval-pcमावळbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४shrirang barneश्रीरंग बारणेEknath Shindeएकनाथ शिंदे