शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वेश्या व्यवसायात अडकली छत्तीसगडची अभिनेत्री; कारवाईनंतर तिच्यासह २ महिलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 16:49 IST

पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतीत अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतीत अनधिकृत पणे वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. शहरात छत्तीसगडच्या एका अभिनेत्रीकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली आहे. कारवाई बुधवारी (दि. २३) ताथवडे येथील एका लॉजवर करण्यात आली. कारवाईत अभिनेत्री आणि दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. 

या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी (वय ४८, रा. वाघोली. मूळ रा. राणी स्टेशन, जि. पाली, राजस्थान), हेमंत प्रणाबंधू साहू (वय ३२ रा. पुणे-नगर रोड, वाघोली. मूळ रा. कुसुमुंडिया, दासीपुर, पंगातीरा डिंगालाल परांगजाल उडीसा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि हेमंत हे दोघेजण त्यांचे साथीदार मुकेश, करण आणि युसूफ यांच्या सांगण्यावरून मोबाईलवरून व्हाट्स अप कॉल करून वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवण्याचे काम करत होते. संबंधित मुली त्यांच्या नावावर हॉटेलमध्ये रूम बुक करत होते. सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे येथील लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावला. त्यानंतर लॉजवर छापा मारून कारवाई केली. 

सुटका केलेल्या मुलींमध्ये एक छत्तीसगडची अभिनेत्री आहे. दुसरी राजस्थान तर तिसरी मुंबई येथील आहे. सुटका केलेल्या मुलींच्या माध्यमातून आरोपी जितेंद्र आणि हेमंत यांना वेश्या व्यवसायाचे पैसे नेण्याच्या बहाण्याने बोलावून पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींकडून १० हजार रुपये रोख रक्कम, ९ हजार ५०० रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि १०० रुपयांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोंढे, अमोल साडेकर, अमोल शिंदे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, सुमित डमाळ, अतुल लोखंडे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे, सोनाली माने यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Womenमहिलाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारी