पक्षनिधीत गुंतले पदाधिकारी

By Admin | Updated: February 15, 2017 02:18 IST2017-02-15T02:18:04+5:302017-02-15T02:18:04+5:30

महापालिका निवडणुक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेनेतील काही पदाधिकारी उमेदवारांकडून

In-charge office bearers involved | पक्षनिधीत गुंतले पदाधिकारी

पक्षनिधीत गुंतले पदाधिकारी

पिंपरी : महापालिका निवडणुक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेनेतील काही पदाधिकारी उमेदवारांकडून पक्षनिधी जमा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील उमेदवार वैतागले आहेत.
पक्षनिधी द्यायचा की प्रभागात प्रचारासाठी खर्च करायचा या द्वीधा मनस्थितीत उमेदवार आहेत. शिवाय पक्षाने आता निधी जमा केल्यास तो निवडणुकीत कधी खर्च होणार ? असा सवाल उमेदवार करीत आहेत.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. पॅनलमधील उमेदवार निश्चित झाले. उमेदवारीअर्ज भरताना, उमेदवारांकडून पक्षनिधी वसूल करण्यात आला होता. आता ऐन निवडणुकीत पुन्हा उमेदवारांकडे धनादेशाची मागणी केली जात आहे. उमेदवारांकडील धनादेश एका यंत्रणेमार्फत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा केले जात आहेत. प्रचाराचा एक एक दिवस कमी होत आहे.
ज्यांनी धनादेश दिले आहेत, त्यांना दिलेल्या रकमेच्या बदल्यात अपेक्षित सहकार्य पक्षाकडून मिळताना दिसत नाही. स्वत:च्या मर्जीने प्रचारासाठी खर्च करण्याची इच्छा असताना, पदाधिकाऱ्यांकडे निधी दिल्यामुळे मर्जीनुसार खर्च करता येत नाही. ज्यांनी कॉन्ट्रिब्युशन रक्कम जमा केली. त्यांच्याकडून प्रभागातील खर्चाबाबत प्रतिसाद नाही. स्वत:ही खर्च करायचा नाही, दुसऱ्यालाही करू द्यायचा नाही. अशी परिस्थिती अनेक उमेदवारांवर ओढवली आहे.त्यामुळे पक्षनिधी देण्यासाठी उमेदवारांकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार पदाधिकारी वरिष्ठांकडे करू लागले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: In-charge office bearers involved