शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपचे केशव घोळवे यांची वर्णी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 23:52 IST

भाजपकडून तुषार हिंगे यांच्यानंतर उपमहापौर पदासाठी कुणाला संधी मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.

पिंपरी चिंचवड : भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांनी राजीनामा दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर हे पद गेले काही दिवस रिक्त होते. परंतु आता या पदासाठी भाजपकडून केशव घोळवे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. सोमवारी ( दि.2) घोळवे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. 

पिंपरी महानगरपालिकेच्या उपमहापौरपद उमेदवारीसाठी दोन दिवस खलबते सुरू होती. अखेरीस सत्ताधारी भाजपच्या वतीने केशव घोळवे यांचा अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी पंकजा मुंडे गटाची सरशी झाल्याने शहरातील स्थानिक नेतृत्व करणाऱ्या नेत्याना चपराक दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मागील पंधरवढ्यात उपमहापौर तुषार हिंगे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उपमहापौर निवडीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये भाजपच्या वतीने एक एकमेव अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. महापालिकेत भाजपची एकमुखी सत्ता असल्याने उपमहापौरपदी घोळवे यांची निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

.......

मागील आठवड्यापासून उपमहापौरपदासाठी कोणाला संधी मिळणार? याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती. स्थायी समिती, विषय समित्या, महापौर आदी पदांमध्ये पिंपरी विधानसभेला दुजाभाव मिळाल्याची तक्रार पक्षातील कार्यकर्त्यांनी नेतृत्वाकडे केली होती. उपमहापौरपदासाठी पिंपरीला स्थान मिळावे, तसेच भाजपचे निष्ठावान नगरसेवक केशव घोळवे यांना संधी मिळावी, यासाठी लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे अशा जुन्या गटाच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे साकडे घालण्यात आले होते. त्यानुसार मुंडे यांनी घोळवे यांना उमेदवारी द्यावी, अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिले होते. तर घोळवे यांचा पत्ता कट करण्यासाठी भाजपातील एक जुन्या गटाच्या वतीने मोर्चेबांधणी केली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, मुंडे गटाने जोर लावल्याने उपमहापौरपदी घोळवे यांना संधी मिळाली. .......... भोसरी विधानसभा गटाच्या वतीने मोशीतील नगरसेवक वसंत बोराडे यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र, त्यास चिंचवड च्या गटाची मूक संमती होती, पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी घोळवे यांचे नाव शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांना कळवले. त्यानंतर आज घोळवे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे. .........प्राधिकरण अध्यक्षपद मुंडे गटास मिळावे, यासाठी यापूर्वी पंकजा मुंडे यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले होते. त्यानंतर उपमहापौर निवडीत लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंडे गटाची उपमहापौरपदासाठी सरशी झाली आहे. यातून मुंडे गट सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाMayorमहापौर