शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

निगडीतील भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:59 IST

वाहतुकीतील हा बदल पुढील काही दिवस काम पूर्ण होईपर्यंत असणार

ठळक मुद्देअप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्ट नगरमधून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाता येणार

पिंपरी : निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचे काम करण्यासाठी चौकातून जाणारी वाहतूक वळविली आहे. वाहतुकीतील हा बदल पुढील काही दिवस काम पूर्ण होईपर्यंत असणार आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिला आहे.भक्ती शक्ती चौकात उड्डाणपुल कामासाठी वाहतूकीत बदल केला आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना भक्ती शक्ती चौकातून डाव्या बाजूला वळून अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्ट नगरमधून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाता येणार आहे. तसेच पुण्याकडून त्रिवेणीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना भक्ती शक्ती चौकातून डाव्या बाजूला वळून अप्पूघर मार्गे ट्रान्सपोर्टनगर मधून निगडी नाक्यावरून यु टर्न घेऊन पीएमपीएमएल बस डेपोमधून डावीकडे वळून त्रिवेणीनगरकडे जाता येणार आहे. तसेच मुंबईकडून पुण्याकडे जाणा-या वाहनांना पीएमपीएमएल बस डेपोमधून डावीकडे वळून चिकन चौकातून उजवीकडे वळून दुर्गा चौकाकडे जाता येणार आहे. तसेच दुर्गा चौकातून उजवीकडे टिळक चौकाकडे अथवा दुर्गा चौकातून सरळ टेल्को रोडने थरमॅक्स चौकातून खंडोबामाळ येथून मुंबई पुणे महामार्गाकडे जाता येणार आहे.मुंबईकडून प्राधिकरण भेळ चौक, चिंचवडकडे जाणा-या वाहनांना पीएमपीएमएल बस डेपोमधून डावीकडे वळून चिकन चौक, दुर्गा चौक, टिळक चौक मार्गे भेळ चौक, चिंचवडकडे जाता येणार आहे. संभाजी चौकातून मुंबईकडे जाणा-या वाहनांना अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्टनगर मधून मुंबई पुणे रस्त्यावर जाता येणार आहे. संभाजी चौकातून त्रिवेणीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्टनगर मधून निगडी नाका येथून यु टर्न घेऊन पीएमपीएमएल बस डेपोमधून डावीकडे वळून त्रिवेणीनगरकडे जाता येणार आहे. अथवा संभाजी चौकातून भेळ चौक, टिळक चौक मार्गे त्रिवेणीनगरकडे जाता येणार आहे. त्रिवेणीनगरकडून पुण्याकडे जाणा-या वाहनांना टिळक चौकमार्गे अथवा थरमॅक्स चौक, खंडोबा माळ चौकमार्गे पुण्याकडे जाता येणार आहे.  त्रिवेणीनगरकडून संभाजी चौक बिजलीनगरकडे जाणा-या वाहनांना दुर्गा चौक, टिळक चौक मार्गे भेळ चौकातून बिजलीनगरकडे जाता येणार आहे.  त्रिवेणीनगरकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक चौक,भक्ती शक्ती चौकातून डावीकडे वळून अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्ट नगर मधून मुख्य रस्त्यावरून मुंबईकडे जाता येणार आहे. तसेच किंवा टिळक चौकातून भेळ चौक मार्गे, रावेत मार्गे मुंबईकडे जाता येणार आहे.

टॅग्स :nigdiनिगडीTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस