शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

Pimpri Chinchwad: बाप्पांच्या निरोपासाठी वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

By नारायण बडगुजर | Updated: September 27, 2023 19:59 IST

वाहतुकीत बदलाबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिले. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे...

पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेने वाहतुकीत बदल केले आहेत. वाहतुकीत बदलाबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिले. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. 

भोसरी वाहतूक विभागांतर्गत बदल :

फुगेवाडी -दापोडी उड्डाणपूल मार्गे शितळादेवी चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीस प्रवेश बंदी आहे. पर्यायी मार्ग म्हणून शितळादेवी चौकातून उजवीकडे वळून सांगवी मार्गे इच्छितस्थळी वाहने जातील. तसेच फुगेवाडी चौकातून हॅरीस पुलाच्या अंडरपासने बोपोडी मार्गे इच्छितस्थळी वाहने जातील. वाहतुकीतील हा बदल गुरुवारी दुपारी दोन ते रात्री अकरा दरम्यान आहे.  

वाकड वाहतूक विभाग :

वाकड विभागात गुरुवारी दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत वाहतुकीत बदल आहे. साठे चौक येथून दत्त मंदिर रस्त्याला जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. पर्यायी मार्ग म्हणून दत्तमंदिर रस्त्याने जाणारे वाहनचालक डावीकडे कावेरीनगर किंवा उजवीकडे काळाखडक चौक मार्गे इच्छितस्थळी वाहने जातील. वाकड चौकाकडून दत्तमंदिर रस्त्याला जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. वाकड चौकातून पुढे कस्पटे काॅर्नर मार्गे वाहने इच्छितस्थळी जातील. उत्कर्ष चौकाकडून दत्तमंदिर रस्त्ता वाकड येथे येणाऱ्या वाहनांना म्हातोबा चौक येथून प्रवेश बंदी आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कस्पटे काॅर्नर येथून वाहने इच्छितस्थळी जातील. पोलारीस हाॅस्पिटल चौक दत्तमंदिर रस्ता तसेच सम्राट चौक दत्तमंदिर रस्ता येथील वाहतूक गरजेनुसार वळविण्यात येईल. 

चिंचवड वाहतूक विभाग : 

चिंचवड वाहतूक विभागांतर्गत गुरुवारी दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत वाहतुकीत बदल आहे.- अहिंसा चौक ते चापेकर चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीला बंदीपर्यायी मार्ग - एसकेएफ चौकातून खंडोबा माळकडून मुंबई-पुणे महामार्गाने इच्छित स्थळी जातील.- दळवीनगर पुलाकडून चापेकर चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदीपर्यायी मार्ग- एसकेएफ चौकाकडून बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी वाहने जातील.- वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडून चापेकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना बंदी.पर्यायी मार्ग : वाल्हेकरवाडी जुना जकात नाका डावीकडे वळून जैन शाळेपासून बिजलीनगर अथवा एसकेएफ मार्गे खंडोबामाळ मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.- लिंकरोडवरून चापेकर चौकातील पीएमटी बसथांबा येथून चापेकर चौकात जाण्यास वाहनांना प्रवेश- पर्यायी मार्ग : लिंकरोडने येणारे वाहनचालक डावीकडे वळून काळेवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.- भोई आळी तसेच चिंचवड चौकी येथून चापेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंदी.- पर्यायी मार्ग : केशवनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.- चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी रिव्हर व्ह्यू चौकाकडे जाण्यास बंदी.पर्यायी मार्ग : चिंचवडे फार्म वाल्हेकरवाडी संत तुकाराम महाराज पूल रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील.- अहिंसा चौक व रिव्हर व्हयु चौकाकडून चापेकर उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी- पर्यायी मार्ग : रिव्हर व्ह्यू चौककडून वाल्हेकरवाडी मार्गे इच्छित स्थळी व अहिंसा चौक ते महावीर चौक किंवा एसकेएफ चौक मार्गे इच्छितस्थळी वाहने जातील. 

पिंपरी वाहतूक विभाग : 

पिंपरी वाहतूक विभागात गुरुवारी दुपारी दोन ते रात्री बारापर्यंत वाहतुकीत बदल केला आहे. पिंपरी चौकातून शगुन चौकाकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. पर्यायी मार्ग म्हणून पिंपरी पुलावरून उजवीकडे वळून भाटनगर मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच मोरवाडी मार्गे एम्पायर इस्टेट येथील मदर टेरेसा उड्डाणपुलावरून काळेवाडी मार्गे इच्छित स्थळी वाहने जातील. 

काळेवाडी पुलावरून डिलक्स चौक, कराची चौकाकडे वाहनांना प्रवेश बंदी आहे. काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे महात्मा फुले काॅलेज, डेअरी फार्म मार्गे मुंबई-पुणे महामार्गा मार्गे इच्छित स्थळी वाहने जातील. पिंपरी चौकातून गोकूळ हाॅटेलकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना बंदी आहे. पर्यायी मार्ग म्हणून पिंपरी चौकाकडून पिंपरी सेवा रस्त्याने क्रोमा शोरूम समोरून इच्छित स्थळी वाहने जातील.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे