शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचा मार्ग बदलावा, बाणेरमधील लोकांना होईल फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 06:15 IST

रस्तारुंदीकरणाला नागरिकांचा वाढता विरोध होत असल्याने हिंजवडी ते शिवाजीनगर येथून जाणा-या प्रस्तावित मेट्रोचा बाणेर बालेवाडीमधून जाणारा मार्ग बदलण्यात यावा

बाणेर : रस्तारुंदीकरणाला नागरिकांचा वाढता विरोध होत असल्याने हिंजवडी ते शिवाजीनगर येथून जाणा-या प्रस्तावित मेट्रोचा बाणेर बालेवाडीमधून जाणारा मार्ग बदलण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या स्थानिक नगरसेवकांनी केली आहे.सध्या मेट्रोचा मार्ग बालेवाडी फाटा ते लक्ष्मीमाता मंदिरमार्गे दसरा चौक असा आखण्यात आला आहे. हा मार्ग विकास आराखड्यानुसार २४ मीटरचा आहे. मेट्रोसाठी हा मार्ग ६ मीटरने वाढवावा लागणार आहे. यामुळे दोनच वर्षांत या मार्गावर रस्ता रुंदीकरणासाठी नागरिकांना पुन्हा जागा द्याव्या लागणार आहेत. तसेच काही ठिकाणी नागरिकांनी बांधलेली घरे तोडावी लागणार आहेत. यामुळे नागरिकांनी या मार्गाला विरोध दर्शवला आहे.ज्योती कळमकर म्हणाल्या, मेट्रोचा मार्ग ३0 मीटर सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरून घेतल्यास अधिक नागरिकांना त्याचा फायदा होईल. तसेच हायास्ट्रीटवरून मेट्रो गेल्यास अनेक लोक बेघर होण्यापासून वाचतील. तसेच नागरिकांचा विरोधही होणार नाही. यासाठी २६ डिसेंबर, २0१७ रोजी लेखी पत्रव्यवहारदेखील केला आहे.मेट्रोचा मार्ग बालेवाडी फाटा चाकणकर मळा परिसरातून घेण्याऐवजी हा मार्ग हायस्ट्रीट परिसरातून आखण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी केली आहे.नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, हायस्ट्रीट परिसरातून मेट्रो मार्ग आखल्यास मेट्रो वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच बाणेर बालेवाडीमधील अनेक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच अनेक नागरिक बेघर होणार नाहीत. यामुळे हायस्ट्रीट नागरिकांचा विरोध होणार नाही. यामुळे हा मार्ग घेण्यात यावा.बाणेरमधील लोकांना होईल फायदा -गणराज मंगल कार्यालयापासून हायस्ट्रीट परिसरात 30 मीटर रस्त्याची उपलब्धता आहे. तसेच बाणेर परिसरातील बहुतांश नागरिकांना या मेट्रोचा फायदा घेता येईल.बालेवाडी येथील दसरा चौकामध्येदेखील नागरिकांना मेट्रोचा फायदा होईल. याचा विचार करून या मार्गाच्या लेखी सूचना नगरसेवकांनी पीएमआरडीए, पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिल्या आहेत.मेट्रो मार्ग हायस्ट्रीट परिसरातून घेतल्यास बाणेरमधील धनकुडेवस्ती, डोंगराजवळील सोसायट्या यांनादेखील मेट्रोचा फायदा होईल. यामुळे सध्या प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्गामध्ये बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो