शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

देशात परिवर्तन होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येणार :  रत्नाकर महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 20:05 IST

एनडीए सरकारने असंघटीत कामगार याविषयावरील चर्चा देखील बंद केली.

पिंपरी  : लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्ताबदल होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येईल. त्यानंतर असंघटीत कामगार व समाजातील दुर्लक्षित घटकांबाबत असंघटीत कामगार काँग्रेसने काम करावे, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी सांगितले.     पिंपरीत असंघटीत कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यालयाचे उद्घाटन डॉ. महाजन यांच्या हस्ते केले. या वेळी असंघटीत कामगार काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक रमेश व्यास, निरीक्षक पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस  अध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सुंदर कांबळे, शामला सोनवणे, शहराध्यक्षा शीतल कोतवाल,  मयूर जैसवाल, लक्ष्मण रूपनर, अनिरूद्ध कांबळे, विशाल कसबे, परशुराम गुंजाळ, मकरध्वज यादव,संखेश ओव्हाळ, पूजा चिंडालिया, सीमा वाल्मिकी, मंदा भवार आदी उपस्थित होते.     डॉ. महाजन म्हणाले, देशभर असंघटीत कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी व त्यांच्या कल्याणासाठी संयुक्त पूरोगामी आघाडीचे तत्कालीन पंतप्रधान  डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अर्जूनसेन गुप्ता यांची राष्ट्रीय कमिटी स्थापन केली. असंघटीत याचा अर्थ स्वत:च्या कुटुंबाच्या चरिताथार्साठी कुठेही नोकरी न करता स्वयंरोजगार करणारी व्यक्ती. परंतू त्यांना आरोग्य, विमा व भविष्य निर्वाह निधीसारख्या सुविधा उपलब्ध नसतात. अशा व्यक्तींना सुविधा मिळवून देण्याचे काम युपीए सरकारने केले. गेल्या निवडणुकीत निव्वळ ३१ टक्के मतदान मिळविणारे एनडीएचे सरकार सत्तेत आले. या सरकारने असंघटीत कामगार याविषयावरील चर्चा देखील बंद केली. मात्र, २३ मेला होणा-या सत्तांतरानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सामान्य माणसाच्या उपयोगी असणा-या योजना जोमाने सुरु करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. प्रास्ताविक सुंदर कांबळे, सुत्रसंचालन शीतल कोतवाल, तर आभार नितीन पटेकर यांनी मानले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसBJPभाजपा