शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मावळ तालुक्यात 'चाले ऊन-पावसाचा खेळ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:05 IST

मावळासह कामशेत व परिसरात पावसाचा जोर कायम असून श्रावण महिन्यातील ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सोमवारी सकाळपासून काही काळ पावसाने उघडीप दिली.

कामशेत : मावळासह कामशेत व परिसरात पावसाचा जोर कायम असून श्रावण महिन्यातील ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सोमवारी सकाळपासून काही काळ पावसाने उघडीप दिली. मात्र संततधार सुरूच होती. मागील काही दिवसांपासून पावसाने परिसरात धुवाधार बरसात केली आहे. शेतीची कामेही पूर्ण झाली आहेत. संततधार पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत होत आहे, शिवाय भात खाचरात पाणी साचल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. वडिवळे, आंद्रा, पवना व मावळातील इतर सर्व धरणे शंभर टक्के भरली असल्याने धरणातून पावसाच्या प्रमाणानुसार पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे इंद्रायणी, पवना, कुंडलिका आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

शहरासह मावळात पावसाची संततधार सुरूच असून, इंद्रायणी, कुंडलिका, पवना नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.नारळी पौर्णिमेच्या दिवशी पावसाने दिवसभर बरसात केली. मात्र सोमवारपासून पावसाचा ऊन-पावसाचा खेळ सुरु होता. इंद्रायणी नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली असून या वाहत्या पाण्याच्या जास्त जवळ जाताना खबरदारी घ्यावी, अशी प्रशासनाने सूचना दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.४वडिवळे धरण परिसरात १ जून ते २७ आॅगस्टपर्यंतच्या काळात ३३२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजेच चोवीस तासांत २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वडिवळे धरणाचा एकूण पाणीसाठा ४०.८७ दशलक्ष घनमीटर झाला आहे. तर उपयुक्त पाणीसाठा ३०.३९ दशलक्ष घनमीटर आहे. वडिवळे धरण शंभर टक्के भरले असून या धरणाच्या पाण्याची पातळी ६३४ मीटर झाली आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातून ६८८ क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, पावसाचा जोर वाढल्यास पाणी सोडणे कायम राहील. याबाबत नदीपात्राच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती वडिवळे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

टॅग्स :Rainपाऊसmavalमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड