शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून तरुणावर लोखंडी गज व काचेच्या बाटल्यांनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 22:42 IST

किरकोळ कारणावरून २६ वर्षाच्या तरुणावर लोखंडी गज व काचेच्या बाटल्यांनी वार करून जखमी केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर चाकण पॉकीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली. 

चाकण  - किरकोळ कारणावरून २६ वर्षाच्या तरुणावर लोखंडी गज व काचेच्या बाटल्यांनी वार करून जखमी केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर चाकण पॉकीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना नाणेकरवाडी गावच्या हद्दीत समाधान चायनीज सेंटरवर १ जुलै रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. याबाबत महेश बबन कड ( वय २६, रा. कडाचीवाडी, हनुमान मंदिरा शेजारी, बादे वस्ती, तालुका खेड, जिल्हा पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी 1) संदीप कुसाळकर ( रा. मेदनकरवाडी, तालुका खेड ), 2) बाळासाहेब बांगर ( रा. नाणेकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे ), 3) अमोल लष्करे ( रा. नाणेकरवाडी, तालुका खेड ), 4) अण्णा उर्फ अमित माने ( रा. मेदनकरवाडी, तालुका खेड ) व त्यांचे सात ते आठ साथीदार यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६०२/२०१८ भा द वि कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १२० ब, १०९, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी क्रमांक एक व दोन यांचे व फिर्यादीचा भाऊ अक्षय कड व इतर साथीदार असे हनुमान मंदिरासमोर  दिनांक १ जुलै रोजी  सव्वा आठच्या सुमारास आरोपी नंबर एक व इतर यांनी त्यांना ठाकर वस्ती येथे जाण्याचा रस्ता चांगला आहे का चिखल आहे असे चेतन कडे विचारल. त्यावर आरोपी क्रमांक एक याने तुम्हाला रस्ता सांगता येत नाही का ? असे म्हणत म्हणाले ने भांडण झाले होते. सदर भांडणाचा राग मनात धरून आरोपी आरोपींनी कट रचून आरोपी नंबर १ व २ यांनी आरोपी नंबर २ ते ४ व त्यांचे इतर सात ते आठ साथीदार यांना सांगून व प्रेरणा दिल्याने आरोपी नंबर ४ यांनी फिर्यादीचे मोबाईलवर फोन करून आरोपी क्रमांक एक व दोन यांचे मालकीचे अपाचे मोटर सायकल ची चावी समाधान चायनीज सेंटर येथे घेऊन ये असे म्हणाल्याने फिर्यादी व फिर्यादीचा मित्र रोहित उर्फ सोन्या बिबीशन शितोळे मोटरसायकल ( नंबर एम एच १४ ईएफ ५१२१ ) वरून सदर ठिकाणी गेल्यावर आरोपी नंबर तीन व चार तसे त्यांचे इतर सात ते आठ साथीदारांनी बेकायदा जमाव जमवून काचेच्या बाटल्या लोखंडी गज अशा साहित्याने फिर्यादीच्या अंगावर धावून गेले, व आरोपी नंबर तीन याने त्याचे सोबत चे इतर सात ते आठ साथीदारांनी फिर्यादीचे डोक्यात, हातावर, पायावर लोखंडी गज व काचेच्या बाटल्यांनी मारहाण केली. व फिर्यादीचे डोक्यात आपखुशीने किरकोळ व गंभीर दुखापत केली. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष पवार पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड