शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव दाभाडे येथे सोनसाखळी चोरीच्या घटनात वाढ ;सलग दुसऱ्या दिवशीही मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 20:40 IST

राव कॉलनीतील घराकडे जात असताना  एका ज्येष्ठ पादचारी महिलेच्या गळ्यातील ७०हजार रुपये किमतीचे  गंठण आणि सोन्याची साखळी दुचाकीवरून  आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी  हिसकावली.

तळेगाव दाभाडे :.या संदर्भात सिंधू व्दारकानाथ निळकंठ (वय ६२, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी येथील  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .तळेगाव  शहरात सलग दुसऱ्या दिवशी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे अलंकार खेचण्याची  घटना घडल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोनसाखळी चोरट्यांचा  महिलांनी आता  धसका घेतला आहे. चोरांना पोलिसांचे भयच उरले नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे  नागरिकांचे म्हणणे आहे.

पोलीस सुत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार , सिंधू  निळकंठ या मारुती मंदिर चौकातून पायी  राव कॉलनीतील  घराकडे सोमवारी रात्री जात  असता मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी  त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची साखळी व सोन्याचे मिनी गंठण असा एकूण ७० हजार  रुपये किमंतीचा ऐवज  हिसकावला.नंतर त्यांनी दुचाकीवरून पलायन केले.परिसरातील सीसीटीव्ही चे फुटेज तपासण्याचे काम चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.तळेगाव  स्टेशन येथे  रविवारी  सायंकाळी  चोरट्यांनी सोनाली मराठे या महिलेच्या  गळ्यातील चार तोळे सोन्याचे ९२हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकाविले.तर सलग दुसऱ्या दिवशी  सोमवारी रात्री  चोरट्यांनी सिंधू  निळकंठ या महिलेच्या गळ्यातील गंठण आणि सोन्याची साखळी  हिसकावली.  पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक विजय संकपाळ करीत आहे.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCrime Newsगुन्हेगारी